मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पृथ्वीचा गाभा त्याच्या भ्रमणाची दिशा बदलणार! पृथ्वीवरील जीवसृष्टीवर असा होईल परिणाम

पृथ्वीचा गाभा त्याच्या भ्रमणाची दिशा बदलणार! पृथ्वीवरील जीवसृष्टीवर असा होईल परिणाम

 पृथ्वीच्या गाभ्याचं रोटेशन हे वरच्या पृष्ठभागाची स्थिरता निश्चित करतं. या रोटेशनमध्ये सुमारे 70 वर्षांनी बदल होतो. आता तोच बदल होणार आहे.

पृथ्वीच्या गाभ्याचं रोटेशन हे वरच्या पृष्ठभागाची स्थिरता निश्चित करतं. या रोटेशनमध्ये सुमारे 70 वर्षांनी बदल होतो. आता तोच बदल होणार आहे.

पृथ्वीच्या गाभ्याचं रोटेशन हे वरच्या पृष्ठभागाची स्थिरता निश्चित करतं. या रोटेशनमध्ये सुमारे 70 वर्षांनी बदल होतो. आता तोच बदल होणार आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 25 जानेवारी :  आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरताफिरता स्वत:भोवतीही फिरते, ही गोष्ट जवळपास सर्वांनाच माहिती आहे. मात्र, आपल्या पृथ्वीचं केंद्रसुद्धा फिरतं आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? पृथ्वीच्या गाभ्याच्या केंद्रस्थानी गरम आणि घन लोखंडी कवच आहे. ज्यामुळे पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र आणि गुरुत्वाकर्षण शक्ती तयार होते. पृथ्वीचं केंद्र एकाच दिशेनं फिरत असल्यामुळे हे घडतं. पण, केंद्राची ही गती काही काळ थांबली आणि नंतर तिची दिशा बदलली तर काय होईल? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, शास्त्रज्ञ आणि भूकंपशास्त्रज्ञांनी (सायस्मॉलॉजिस्ट) यांना असं आढळलं आहे की, पृथ्वीचा गाभा आपल्या रोटेशनची दिशा बदलण्याच्या तयारीत आहे. त्याआधी तो काही काळ ब्रेक घेणार आहे. म्हणजेच पृथ्वीचं रोटेशन थांबेल. एका वृत्तवाहिनीनं या प्रकारचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. पृथ्वीच्या गाभ्याचं रोटेशन हे वरच्या पृष्ठभागाची स्थिरता निश्चित करतं. या रोटेशनमध्ये सुमारे 70 वर्षांनी बदल होतो. आता तोच बदल होणार आहे. पृथ्वीचं केंद्र आपल्या रोटेशनची दिशा बदलण्याच्या तयारीत आहे.

हे ही वाचा  : न्यूझीलंडचा धुव्वा! वर्ल्ड कपआधी वनडे रँकिंगमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर

हे रोटेशन काही सेकंदांसाठी थांबून त्याची दिशा बदलल्यास पृथ्वीवर कोणताही विशेष परिणाम होणार नाही. शास्त्रज्ञांनी खूप अभ्यास करून हे मॉडेल तयार केलं आहे. जेणेकरून त्यांना पृथ्वीच्या केंद्राचा उर्वरित जगाशी असलेला संबंध समजू शकेल. बीजिंगमधील पेकिंग युनिव्हर्सिटीतील सायस्मॉलॉजिस्ट डॉ. जिओडोंग साँग यांनी सांगितलं की, आपल्या ग्रहाच्या आत एक ग्रह आहे. त्यामुळे त्याच्या भ्रमणाबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे.

1936 मध्ये डच भूकंपशास्त्रज्ञ इंग लेहमन यांनी पृथ्वीच्या गाभ्याच्या रचनेचा शोध लावला होता. पृथ्वीचा द्रव बाह्य गाभा एका घन धातूच्या बॉलभोवती म्हणजेच आतील गाभ्याभोवती गुंडाळलेला आहे, असं लेहमन यांनी शोधलं होतं. तेव्हापासून पृथ्वीच्या गाभ्याबाबत शास्त्रज्ञांच्या मनात उत्सुकता आणि आश्चर्य आहे. दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील भूकंपशास्त्रज्ञ जॉन विडाले म्हणतात की, गरम लोखंडाचा गोळा पृथ्वीच्या मध्यभागी फिरत आहे ही एक अतिशय विचित्र घटना आहे.

हे ही वाचा  : शुभमन गिलने केली कमाल! बाबर आझमच्या या विक्रमाशी केली बरोबरी

पृथ्वीचा अंतर्भाग महत्त्वाचा का आहे?

पृथ्वीचं केंद्र का फिरतं? यामागचं कारण डॉ. साँग यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, "पृथ्वीच्या आतील गाभ्यावर बाहेरील गाभ्यानं निर्माण केलेला दबावामुळे पृथ्वीचं केंद्र फिरतं." द्रव बाह्य गाभा घन लोखंडाला स्वतःकडे खेचत राहतो. यातून निघणाऱ्या लहरी आवरणाला हादरवतात. त्यामुळे शक्तिशाली गुरुत्वाकर्षण निर्माण होतं. हे बल आतील गाभ्याची गती कमी करतं. डॉ. साँग यांच्या अभ्यासानुसार, पृथ्वीचा बाह्य आणि आतील गाभा यांच्यातील संघर्षामुळे केंद्राच्या रोटेशनची दिशा दर 70 वर्षांनी बदलते.

पृथ्वीच्या गाभ्याचे फिरणं हे मोठं कोडं आहे

शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की, लोखंड आणि निकेलपासून बनलेला हा चेंडू गरम लोखंडाभोवती फिरतो. पृथ्वीचं केंद्र सुमारे 2011 किलोमीटर लांब आहे आणि ते सूर्याच्या पृष्ठभागाइतकंच गरम आहे. 90 च्या दशकात, डॉ. साँग हे पहिले शास्त्रज्ञ होते, ज्यांनी सांगितलं की पृथ्वीचं केंद्र वेगवेगळ्या गतीनं फिरत आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर असं आढळत नाही. तेव्हापासून, जगातील अनेक शास्त्रज्ञांनी याबाबत पुरावे गोळा केले आहेत की, पृथ्वीचं केंद्र वेगवेगळ्या वेगानं फिरत आहे.

दर 70 वर्षांनी केंद्र घेतं ब्रेक

ही क्रिया समजून घेण्यासाठी पुढील उदाहरणाचा उपयोग होऊ शकतो. समजा 1970 च्या सुरुवातीला पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तुलनेत आतील गाभा फिरत नव्हता. पण, हळुहळू तो पूर्व दिशेकडून फिरू लागला. त्याचा वेगही वाढू लागला. हा वेग पृष्ठभागाच्या वेगापेक्षाही जास्त होता. पण नंतर त्याचा वेग कमी होऊ लागला. 2009 ते 2011 या काळापर्यंत पृथ्वीच्या गाभ्यानं ब्रेक घेतला. त्याचा वेग फार कमी होतो आणि थांबता. नंतर काही काळानंतर हा गाभा हळूहळू पश्चिमेकडे फिरू लागतो.

या गणितानुसार, 2040 च्या सुमारास पृथ्वीचा गाभा पुन्हा पूर्वेकडे सरकू लागेल. म्हणजेच, पृथ्वीच्या पूर्व आणि पश्चिम दिशेतील परिभ्रमणातील व्यत्यय आणि बदल आजपासून 17 वर्षांनंतर येईल. पण, यामुळे कोणताही प्रलय निर्माण होणार नाही. फार-फार तर पृथ्वीला भूकंपाचे सौम्य धक्के बसू शकतात. या क्रियेमुळे दर सहा वर्षांनी दिवसाच्या वेळेत काही मिलीसेकंदांचा फरक पडतो.

अणुचाचण्या आणि भूकंपानी बदललं केंद्र

पृथ्वीच्या वयानुसार, हे केंद्र किंचित थंड होण्याची आणि स्फटिक बनण्याची घटना काही कोटी वर्षांपूर्वी घडली होती. पृथ्वीच्या केंद्राचा अभ्यास करणं सोप नाही. तेथून नमुने घेणंही अवघड आहे. पण, शीतयुद्धाच्या काळात झालेल्या अणुचाचण्या आणि भूकंपामधून निघणाऱ्या लहरींचा परिणाम पृथ्वीच्या केंद्रावर होत आहे. यामुळे केंद्रात होत असलेल्या बदलांचा अभ्यास करण्यास मदत होते.

First published:

Tags: Earth