नवी दिल्ली, 21 मे : दिवसेंदिवस अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक अपघाताची प्रकरणे समोर येत आहेत. रस्ते अपघातात दरवर्षी लाखो लोकांचा जीव जातो. काही अपघातांचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर समोर येतात. नुकताच एका भयावह अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. अंगावर काटा आणणारा हा अपघात घडला. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की एक आलिशान कार ट्रकखाली घुसली आहे. ती ट्रकमध्ये गंभीरपणे अडकली आहे आणि पूर्णपणे चिरडली आहे. त्याचे दारही उघडता येत नाहीये. दोन लोक कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत आहेत. कसा तरी बळजबरी करून तो दरवाजा उघडतो आणि कारमध्ये अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढतात.
एवढ्या धोकादायक अपघातातही गाडीतील व्यक्तीचा जीव वाचला ही आश्चर्याची बाब आहे. त्याला अजिबात दुखापत झाली नाही असं व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा अपघात कसा घडला आणि कुठे घडला याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नसली तरी हा अपघात किती गंभीर आहे, याचा अंदाज तो व्हिडिओ पाहून तुम्ही लावू शकता.
Importance of seat belt and airbag....... pic.twitter.com/qpRHA1zT37
— Swati Lakra (@SwatiLakra_IPS) May 19, 2023
अपघाताचा व्हिडिओ महिला आयपीएस अधिकारी स्वाती लाक्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला. कॅप्शनमध्ये सीट बेल्ट आणि एअरबॅगचे महत्त्व सांगितले. अवघ्या 27 सेकंदांचा हा व्हिडिओ 2 लाख 98 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 6 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे. दरम्यान, रस्त्यावर चालताना किंवा गाडी चालवताना नेहमी सतर्क राहण्याचं आवाहन केलं जातं. वाहुकीच नियम पाळले तर अपघात होण्याचं प्रमाण कमी होईल आणि लोकांना जीवही गमवावा लागणार नाही.