हनोई, 02 मार्च : स्पायडरमॅन, बॅटमॅन, सुपरमॅन असे टीव्हीवरील सुपरहिरो (superhero) तुम्ही पाहिलेच असतील. पण सध्या सोशल मीडियावर (social media) चर्चेत आहे तो रिअल लाइफमधील सुपरहिरोची. ज्याने अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीचा जीव वाचवला आहे. 12 व्या मजल्यावरून कोसळलेल्या या चिमुकलीला एका डिलीव्हरी बॉयनं एखाद्या सुपरहिरोसारखंच धावत येऊन वाचवलं (delivery boy saved 2 year old girl who fall from building) आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (viral video) होतो आहे.
ही घटना आहे व्हिएतनाममधील (vietnam). जिथं दोन वर्षांची चिमुकली 12 व्या मजल्यावरून कोसळली आहे. सुदैवानं इमारतीजवळ खाली एक डिलीव्हरी बॉय होता, त्याच्या लक्षात हे येताच त्याने धावत येत चिमुकलीला कॅच केलं आहे.
व्हिडीओत पाहू शकता इमारतीच्या बाराव्या मजल्यावर गॅलरीला ही चिमुकलीला लटकताना दिसते आहे. सुरुवातीचा काही वेळ ती अशीच लटकते. ती मोठमोठ्याने रडू लागते. तिला वाचवण्यासाठी लोकांचा आरडाओरडाही सुरू होतो. त्याच बिल्डिंगच्या खाली एक डिलीव्हरी बॉयही उभा होता. त्याला हा आवाज ऐकू येताच तो आपल्या आजूबाजूला पाहतो.
बिल्डिंगवर पाहतो तर त्याला चिमुकली तिथं बाराव्या मजल्यावर लटकताना दिसते. क्षणाचाही विलंब न करता तो तिथं धावत सुटतो. मुलीला वाचवण्यासाठी धडपड करतो. जिथं ती मुलगी लटकत असते बरोबर त्याच ठिकाणी तो खाली येऊन उभा राहतो. काही वेळात चिमुकलीचा हात सुटतो आणि ती वेगानं खाली कोसळलेत. सुदैवानं तोपर्यंत डिलीव्हरी बॉय तिथं पोहोचलेला असतो तो तिला अलगद पकडतो.
हे वाचा - याला कोणतीच मुलगी नाही म्हणणार नाही, तरुणानं केलं असं हटके प्रपोज; VIDEO VIRAL
हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चिमुकलीला वाचवण्यासाठी डिलीव्हरी बॉय अगदी देवदूतासारखा धावून आला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral videos