जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 29 सेकंदाच्या Video मुळे आनंद महिंद्रांची सुट्टी विचार करण्यातच गेली; व्यक्तीचं नशीब पाहून झाले हैराण!

29 सेकंदाच्या Video मुळे आनंद महिंद्रांची सुट्टी विचार करण्यातच गेली; व्यक्तीचं नशीब पाहून झाले हैराण!

29 सेकंदाच्या Video मुळे आनंद महिंद्रांची सुट्टी विचार करण्यातच गेली; व्यक्तीचं नशीब पाहून झाले हैराण!

ज्येष्ठ उद्योगपती आनंद महिंद्रांनी (Anand Mahindra) नुकताच त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

  • -MIN READ Trending Desk Viralimalai,Pudukkottai,Tamil Nadu
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 5 ऑगस्ट : सोशल मीडियावरचे काही व्हिडिओ आश्चर्यचकीत करतात. सामान्य नागरिकांना आश्चर्य वाटतं यात काही नवल नाही, पण कधीकधी असे व्हिडिओ मोठ्या असामींनाही तोंडात बोटं घालायला लावतात. ज्येष्ठ उद्योगपती आनंद महिंद्रांनी (Anand Mahindra) नुकताच त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ शेअर होत असतात. असाच एक व्हिडिओ ज्येष्ठ उद्योजक आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर (Twitter) हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर तो भरपूर व्हायरल झाला. या व्हिडिओत घडलेली घटना पाहून कोणाच्याही अंगावर शहारे येतील. या व्हिडिओमधील व्यक्तीचं दैव बलवत्तर म्हणून ती अशा घटनेतून सुखरूप बचावली, असं तुम्हालाही वाटल्याशिवाय राहणार नाही. त्याचं नशीब चांगलं नसतं, तर तिथे मोठा अनर्थ घडला असता. आनंद महिंद्रांसारख्या बिझनेस टायकूननाही व्हिडिओ पाहून वाटलेलं आश्चर्य लपवता आलं नाही. त्यामुळे ‘सृष्टी या व्यक्तीला का संकेत देऊ इच्छिते? हाच विचार करत माझा हा वीकेंड जाईल. त्या तरुणाच्या जागी तुम्ही असतात तर काय विचार केला असता?,असा सवाल महिंद्रा यांनी कॅप्शनमधून तो व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्यांना केला आहे. हा व्हिडिओ 29 सेकंदांचा आहे. आणि प्रचंड व्हायरल होत आहे. आतापर्यंत 179.4K व्ह्युज या व्हिडिओला मिळाले असून 7 हजारांहून अधिक युजर्सनी तो लाईक केलाय. 672 जणांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत. ‘पायांखालची जमीन सरकली’ हा वाक्प्रचार नेहमी वापरला जातो. त्याचा शब्दशः अर्थ हा व्हिडिओ पाहिल्यावर उमगेल. या व्हिडिओत एक तरुण एका शहरातील रस्त्यावरून आरामात चालत जाताना दिसतो. तो रस्त्याकडेच्या दुकानात जाण्यासाठी फुटपाथवरून डाव्या हाताला नाल्यावर बांधलेल्या सिमेंटच्या स्लॅबवर पाऊल टाकतो आणि इतक्यात त्याच्या पायाखालची स्लॅबच नाल्यात कोसळते. सुदैवाने तो तरुण नाल्यात न पडता पलीकडे पोहोचलेला असतो.

    जाहिरात

    अगदी काही सेकंदांमुळे तो बचावतो. जर काही क्षणांचा विलंब झाला असता तर तो तरूण वाहत्या नाल्यात पडला असता. या घटनेनंतर दुकानदार बाहेर येतात आणि त्याची चौकशी करतात असं त्या व्हिडिओमध्ये दिसतं आहे. या व्हिडिओतील तरुणाच्या पायांखातलीच जमीन शब्दश: सरकल्याचं दिसतं. ही सगळी घटना दुकानाच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाली आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. आनंद महिंद्रांसारख्या बिझनेस टायकूननं हा व्हिडिओ शेअर केल्यामुळे तो आता खास झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ भरपूर व्हायरल होतो आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात