मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - तरुणाने चालत्या मेट्रो ट्रेनचा हातानेच उघडला दरवाजा आणि...; पुढे जे घडलं ते धक्कादायक

VIDEO - तरुणाने चालत्या मेट्रो ट्रेनचा हातानेच उघडला दरवाजा आणि...; पुढे जे घडलं ते धक्कादायक

मेट्रो ट्रेन थांबते तेव्हाच तिचे दरवाजे आपोआप उघडतात आणि ती सुरू झाली की बंद होतात. असं असताना या तरुणाने चालत्या ट्रेनचा दरवाजा उघडून सर्वांना धक्का दिला आहे.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 29 जुलै : चालत्या रेल्वेमध्ये स्टंट करताना, दरवाजाला लटकताना काही जणांचा जीव गेल्याच्या बातम्या तुम्हाला माहिती असतील. पण रेल्वेच्या तुलनेत मेट्रो ट्रेन याबाबतीलत सुरक्षित आहे. म्हणजे मेट्रो ट्रेन चालू असताना त्याचे दरवाजे बंद असतात. जेव्हा ट्रेन थांबते तेव्हाच त्याचे दरवाजे उघडतात. पण एका तरुणाने मात्र चालत्या मेट्रो ट्रेनचाही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढे जे घडलं ते धक्कादायक आहे. चालत्या ट्रेनमधून एखादी व्यक्ती पडणं किंवा एखाद्याने उडी मारणं शक्य आहे पण चालत्या मेट्रोत हे बिलकुल शक्य नाही. कारण ट्रेनचे दरवाजे उघडे असता किंवा ते उघडता येतात पण मेट्रोच दरवाजे स्वंयचलित असतात. म्हणजे जेव्हा मेट्रो थांबते तेव्हाच त्याचे दरवाजे उघडतात आणि मेट्रो सुरू असेल तर ते बंद असतात. असं असताना या व्यक्तीने मात्र आपल्या हातानेच मेट्रोचा दरवाजा उघडला आणि मेट्रोतून बाहेर उडी मारली. हे वाचा - पहिला परफॉर्मन्स ठरला अखेरचा! डान्स करताना गेला तरुणाचा जीव; मृत्यूचा LIVE VIDEO व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती मेट्रोच्या दरवाजाजवळ उभी आहे. ती मेट्रोचा दरवाजा हाताने उघडण्याचा प्रयत्न करते आणि तो उघडतोसुद्धा. दरवाजा उघडताच तो मेट्रोतून बाहेर उडी मारतो. सुदैवाने जेव्हा तो उडी मारतो तेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्मवर असते ज्यामुळे तो प्लॅटफॉर्मवरच पडतो. पण ट्रेनचा वेग इतका असतो की तो प्लॅटफॉर्मवर धाडकन आपटतो आणि जमिनीवर कोसळतो. पुढे या व्यक्तीचं काय झालं हे माहिती नाही. पण या व्हिडीओत त्याला गंभीर दुखापत नक्कीच झाली असावी हे दिसतं. हे वाचा - VIDEO : गोंदिया रेल्वे स्थानकावर भयानक थरार, एक महिला जमिनीवर कोसळली, दुसरी ट्रेनला लटकली आणि... चालत्या मेट्रोचा दरवाजा उघडून उडी मारणाऱ्या या व्यक्तीला पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.  The Darwin Awards ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत.
First published:

Tags: Metro, Viral, Viral videos

पुढील बातम्या