लंडन, 21 जानेवारी : अनेकदा असं होतं की आपल्याला वाटतं एक आणि असतं काहीतरी भलतंच. असंच एका महिलेसोबत घडलं. तिला तिच्या गार्डनमध्ये साप (Snake) असल्याचं वाटलं. त्याला पाहून ती इतकी घाबरली की तिने भीतीने पोलिसांनाही फोन करून बोलावलं. पण सर्वांसमोर असं काही सापडलं की तिच्यावर तोंड लपवण्याची वेळ आली. सत्य तिच्यासमोर येताच तिला लाज वाटली (Snake video). यूकेच्या वर्किंग्टनमधील कुम्ब्रियातील ही घटना आहे. महिला आपल्या घराच्या गार्डनमध्ये बसली होती. तेव्हा तिला समोर एक साप दिसला. त्यानंतर तिने तात्काळ पोलिसांना फोन लावला. मार्टिन फ्लेचर असं या महिलेचं नाव आहे. एका खुर्चीवर तिला काहीतरी दिसलं. तिने नीट पाहिलं तेव्हा तिला तिथं साप दिसला. हा साधासुधा साप नाही तर खतरनाक विषारी कोब्रा आहे, असं तिला वाटलं. त्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तात्काळ पोलिसांना फोन केला. साप कुणाच्या घरात घुसून कुणाला हानी पोहोचवू नये म्हणून बचाव अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. हे वाचा - OMG! डोळे बंद करून तरुणाने असं काही केलं की VIDEO पाहताच तोंडात बोटं घालाल डेली स्टारच्या रिपोर्टनुसार बचाव अधिकाऱ्यांनी सापाला हलवून पाहिलं पण तो काही हलत नव्हता. अखेर त्याला हातात घेताच सत्य समजलं. तो खराखुरा साप नाही तर एक प्लॅस्टिक खेळणं होतं. महिलेला जो साप वाटलं त्याचं सत्य समजताच तिला लाज वाटली. सिंगापूरमध्ये महिलेला सापाऐवजी सापडला इलेक्ट्रिक टूथब्रश याआधी सिंगापूरमध्येही एका महिलेसोबत असंच घडलं होतं. तिने तर चक्क इलेक्ट्रिक ब्रशलाच साप समजलं होतं. तिच्या बेडरूममधून साप फुत्करत असल्यासारखा आवाज येत होता. आवाज ऐकून ती घाबरली. तिच्या हातापायांना घाम फुटला. तिने तात्काळ प्राणीमित्रांना फोन केला. पथक तिच्या घरी पोहोचलं आणि त्यांनी तपासणी केली आणि भलतंच सापडलं. जिथून आवाज येत होता तिथं साप तर सापडला नाही पण एक टूथब्रश सापडला. इलेक्ट्रिक टूथब्रश होता. हा टूथब्रश बंद चालू करून पाहिला तर त्याच्यातूनच आवाज येत असल्याचं स्पष्ट झालं. या टूथब्रशमध्ये पाणी गेलं होतं, त्यामुळे त्याचा असा विचित्र आवाज येत होता. हा आवाज सापाच्या फुत्करण्यासारखाच होता. त्यामुळे महिलेचीही गफलत झाली. हे वाचा - OMG! डोळे बंद करून तरुणाने असं काही केलं की VIDEO पाहताच तोंडात बोटं घालाल ज्याला आपण साप समजत होतो, तो टूथब्रश निघाला हे महिलेला समजता तिला लाज वाटली. असं लगेच पॅनिक होऊन प्राणीमित्रांना बोलावल्याने तिने माफी मागितली. तसंच आता आपली टूथब्रथ बदलण्याची वेळ आली आहे, हे तिला कळून चुकलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.