जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Live असताना महिला पत्रकाराचा अपघात; मागून गाडीने दिली धडक, Video Viral

Live असताना महिला पत्रकाराचा अपघात; मागून गाडीने दिली धडक, Video Viral

Live असताना महिला पत्रकाराचा अपघात; मागून गाडीने दिली धडक, Video Viral

अपघातानंतरही महिला पत्रकाराने हातातील बुम सोडला नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 जानेवारी : Viral Video: लाइव टीवी रिपोर्टिंग (Live TV Reporting) दिसतं तितकं सोपं काम नसतं. यावेळी पत्रकारांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. असंच एक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. ही घटना बुधवारी घडली. एका लाइव्ह शोदरम्यान वेस्ट वर्जीनियाच्या एका टेलीविजन न्यूज रिपोर्टरला (Female Reporter) एका कारने धडक दिली. धडक देताना रिपोर्टर खाली कोसळली. मात्र त्यानंतर तिने जे काही केलं, ते पाहून लोक स्तब्धचं झाले. (Female journalists accident while live, The car hit from behind Video Viral) गाडीने महिला पत्रकाराला मागून दिली धडक व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एका एसयूव्ही गाडीने महिला पत्रकाराला मागून धडक दिली आणि त्यानंतर महिला पत्रकार खाली कोसळली. ती तोंडावरच पडली. ती कशी बशी करून उठली. उठल्यानंतर तिने कारने धडक दिल्याचं सांगितलं. मात्र मी ठीक असल्याचंही ती यावेळी म्हणाली. हे ही वाचा- Video viral : दुकानावर बसून माकड चक्क विकतंय भाजी, नेमकी कुठली आहे घटना त्यानंतर रिपोर्टरने सांगितला नेमका प्रकार.. टीवी अँकर टिम इर टोरी ठीक असल्याचं विचारलं. यावर रिपोर्टर टोरी योर्गी म्हणाली की, हो मी ठीक आहे. हा तुमच्यासाठी लाइव्ह टीव्ही आहे. कॉलेजमध्ये असतानाही एका कारने मला धडक दिली होती. पण मी ठीक आहे याचा मला आनंद आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

जाहिरात

हफिंगटन पोस्टच्या बातमीनुसार, योर्गीच्या अपघातानंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं. सोशल मीडियावर लोकांनी पत्रकार महिलेचं कौतुक केलं आहे. अशा परिस्थितीतही महिलेने बुम सोडला नाही आणि तिने रिपोर्टिंग कायम ठेवलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात