बँकॉक, 28 ऑक्टोबर: आयुष्यात कुणाच्या तरी प्रेमात माणूस हा पडतोच. लग्नाच्या आधी कोणी प्रेमात पडतं, तर कोणी लग्न झाल्यानंतर! काहींची लव्हस्टोरी यशस्वी होत लग्नाच्या टप्प्यापर्यंत जाते. पण बऱ्याच जणांचं काही कारणांमुळे ब्रेकअप होतं. पण ब्रेकअप झाल्यानंतर खूप दिवसांनी अचानक आपला एक्स जोडीदार भेटला तर, भावनांना आवर घालणं तसं कठीणच. आता हेच पहा ना, थायलंडमध्ये (Thailand) एक एक्स- कपल (Ex-Lovers) ऐतिहासिक वारसास्थळी अचानक एकत्र आले, मात्र त्यांनी भावनेच्या भरात असे काही केलं की त्यांना थेट पोलिसांनी पकडलं. झी न्यूज ने याबाबत वृत्त दिलं आहे.
जेव्हा दोन एक्स पार्टनर थायलंडमध्ये भेटले, तेव्हा त्यांना एकमेकांबद्दल असणाऱ्या भावनांना आवर घालता आला नाही. भावनेच्या भरात दोघांनी असं कृत्य केलं की, एकच गोंधळ उडाला. या दोघांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. हे दोघे बऱ्याच दिवसांनी थायलंडमधील एका ऐतिहासिक वारसास्थळी एकमेकांना भेटले होते, त्यावेळी त्यांनी सर्वांसमोर सेक्स केलं, जे तिथे उपस्थित लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये याचं रेकॉर्डिंग केलं.
हेही वाचा- सत्ता, राजेशाहीवर पाणी सोडत 'या' देशाची राजकुमारी राहणार वन-बीएचकेमध्ये!
पोलिसांनी सांगितले की, 'या जोडप्याने ऐतिहासिक ठिकाणी सेक्स केल्याचे मान्य केले आहे. आरोपीने सांगितले आहे की, दोघेही आधी रिलेशनशिपमध्ये होते, पण नंतर त्यांचं ब्रेक अप झालं. 22 ऑक्टोबरला जेव्हा दोघं एकमेकांसमोर आले, तेव्हा त्यांना त्यांच्या भावनांना आवर घालता आला नाही. एकमेकांच्या जवळ येण्यापासून ते स्वतःला रोखू शकले नाहीत. चालर्म याने पोलिसांना सांगितले की, इमारतीच्या आडोशाला त्यांचे प्रेमसंबंध सुरु होते, त्यामुळे कोणीही आपल्याला पाहणार नाही, असे त्यांना वाटले होते.'
हेही वाचा- रात्रभर वाटतं होतं अस्वस्थ, हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं... कानात शिरलाय कोळी
एक्स प्रियकर किंवा प्रेयसी अचानक समोर आल्यानंतर अनेकदा भावनांवर आवर राहत नाही. पण भावनेच्या भरात सार्वजनिक ठिकाणी आपण चुकीचे तरी वागत नाही ना, याचे भान ठेवणं गरजेचं आहे. थायलंडमध्ये एका एक्स- कपलला हे भान न राहिल्याने त्यांना थेट पोलिसांनी अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral news