मुंबई, 18 ऑक्टोबर : आतापर्यंत नवरदेवाला (Groom video) लग्नाची (Wedding video) घाई लागल्याचं तुम्ही पाहिलं असेल. लग्नासाठी उतावळा नवरा पाहिला असेल पण सध्या अशा एका नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे, ज्याला लग्नाऐवजी घरी जाण्याचीच घाई लागली आहे. कधी एकदा लग्नमंडप सोडून आपण घरी जातो असं त्याला झालं आहे आणि याचं कारण म्हणजे पंडित (Wedding panditji video). पंडितने नवरदेवाला असा प्रश्न विचारला की त्याला घामच फुटला आणि घरी जाण्याची घाई तो करू लागला.
लग्नामध्ये नवरा-नवरीचे रोमँटिक क्षण, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींची मजा-मस्ती, दिर-वहिनी-मेहुणी यांचे डान्स असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले आहेत. पण लग्नातील या सर्व आनंदाच्या क्षणात पंडितजीही मागे नसतात. बरेच पंडित लग्नाचे विधी करता करता त्या विधींचं महत्त्व समजवण्यासह नवरा-नवरीची थट्टा करतानाही दिसतात. असाच हा व्हिडीओ आहे.
पंडितजीने नवरदेवाला लग्नात सर्वांमसोर जणू तोंडावरच पाडलं आहे. यानंतर नवरदेव लग्नमंडपात थांबायलाच तयार नाही. पंडिताच्या एका प्रश्नामुळे नवरदेव पुरता फसला. नवरीसमोरच पंडितने असं काही विचारलं की नवरदेव हडबडला.
View this post on Instagram
व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी शेजारी शेजारी बसले आहेत. लग्नाचे विधी सुरू आहेत. तेव्हा पंडित नवरदेवाला असा प्रश्न विचारतात की नवऱ्याच्या चेहऱ्याचा रंगच उडतो.
हे वाचा - लग्नातच नवरीला उचलून त्यानं स्टेजवरून काढला पळ; VIDEO पाहून नेटकरी शॉक
पंडित नवरदेवाला विचारतात की लग्नाची किती वचनं लक्षात आहेत. नवरदेव म्हणजे पंडितजी सर्व लक्षात आहेत. मग पंडितजी त्याला एखाद वचन सांग, असं सांगतात आणि मग काय सर्व काही लक्षात आहे, असं सांगण्याच्या नवरदेवाला घामच फुटतो. त्याच्या चेहऱ्यावर बारा वाजतात. या प्रश्नाचं उत्तर तर तो देतच नाही पण लगीन आटोपून घरी जाण्याची घाई त्याला होते. आमचा घरी जाण्याचा मुहूर्त झाला आहे, असं सांगून तो हसत हसत प्रश्नाचं उत्तर देण्याचं टाळतो. त्याला पाहून पंडितजी, नवरी आणि तिथं उपस्थित असलेले इतर लोकही हसू लागतात.
हे वाचा - VIDEO - नवरीला पाहताच नवरदेवाच्या मित्रांचा तोल ढासळला; धावत येत सर्वांसमोरच...
आय डोंट से चीज इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जेव्हा पंडितजी तुम्हाला किती वचनं लक्षात आहेत, असं विचारतात तेव्हा असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos, Wedding video