मुंबई, 18 ऑक्टोबर : विद्यार्थ्यांचे (Student) परीक्षेतील (Exam) कॉपीचे फंडे तसे तुम्ही बरेच पाहिले असतील. पण एखाद्या विद्यार्थ्याकडे कॉपी नसेल (Exam copy), त्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर आठवत नसेल तर तो विद्यार्थी काय करू शकतो, याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? (Viral Answer of Student) अशाच एका विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका (Viral Answer Sheet) सोशल मीडियावर व्हायरल होते आहे (Test Sheet gone Viral). ज्यामुळे चक्क शिक्षकही कोमात गेला आहे (Viral copy of Student).
विद्यार्थ्याची ही उत्तर पत्रिका पाहून तुम्ही थक्कच व्हाल. विद्यार्थ्याचं उत्तर सुरुवातीला योग्य वाटतं. पण जसजसं पुढे तुम्ही उत्तर वाचत जाल तर तुमचंही डोकं गरगरेल. उत्तराचं वैशिष्ट्यंही असं आहे की उत्तर जिथून सुरू होतं, तिथंच ते संपतं. विद्यार्थ्याला नेमकं काय सांगायचं आहे, याचं उत्तर तर फक्त तोच देऊ शकतो.
View this post on Instagram
फन की लाइफ इन्स्टाग्राम अकाऊंटवर या उत्तरपत्रिकेचा फोटो शेअर करण्यात आला आहे. उत्तरपत्रिकेवरून भाखडा नागल डॅमबाबत प्रश्न विचारण्यात आल्याचं समजतं.
हे वाचा - बापरे! अस्वलाने प्रेग्नंट महिलेला जमिनीवर आपटलं; सर्कसमधील भयंकर हल्ल्याचा VIDEO
विद्यार्थी उत्तरात लिहितो, धरण सतलज नदीवर बांधलं आहे. पुढे तो सरदार पटेल, टाटा-बाय बाय, पंडित जवाहरलाल नेहरू, गुलाबाचं शेत, चीन, लंडन, जर्मनी आणि विश्वयुद्धापर्यंत पोहोचतो आणि शेवटी फिरून तो विद्यार्थी पुन्हा पंजाब, सतलज नदी आणि धरणावर पोहोचतो.
आता विद्यार्थ्यांचं टॅलेंट पाहून कुणीही थक्क होईल. या उत्तरपत्रिकेवर दहापैकी शून्य गुण देण्यात आले आहे. सोबतच शिक्षक कोमात आहे, अशी कमेंटही या उत्तरपत्रिकेवर दिलेली असल्याचं दिलं आहे. एकाच पानावर इतिहास, भूगोल, कला, साहित्य सर्वकाही दिसलं तर शिक्षकासाठी हा मोठा धक्काच आहे. हा धक्का शिक्षकाला सहन न होणाराच आहे. ज्या शिक्षकाच्या हातात ही उत्तरपत्रिका येईल तो शिक्षक कोमात जाणार नाही तर काय?
हे वाचा - फुटबॉलने केला बाईकस्वारांचा 'गोल'; भयंकर अपघाताचं दृश्य CCTV मध्ये कैद
ही पोस्ट पाहन त्यावर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. बहुतेकांनी विद्यार्थ्यांच्या टॅलेंटला दाद दिली आहे. या विद्यार्थ्याचे पाय धरायला हवेत, त्याला 21 तोफांची सलामी द्यायला हवी, अशा कमेंट नेटिझन्स देत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Exam, Student, Teacher, Viral, Viral news