जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पुजाऱ्याने महिलेला लाथ मारून केस ओढत मंदिराबाहेर काढलं; संतापजनक VIDEO, काय आहे प्रकरण?

पुजाऱ्याने महिलेला लाथ मारून केस ओढत मंदिराबाहेर काढलं; संतापजनक VIDEO, काय आहे प्रकरण?

पुजाऱ्याने महिलेला लाथ मारून केस ओढत मंदिराबाहेर काढलं; संतापजनक VIDEO, काय आहे प्रकरण?

हा व्हायरल व्हिडीओ ४४ सेकंदांचा आहे, ज्यामध्ये ती महिला मूर्तीजवळ बसण्याचा हट्ट करताना दिसते. तर मंदिराचा पुजारी तिचे केस पकडून, लाथ मारून, धक्काबुक्की करत तिला मंदिराबाहेर ओढत असल्याचं पाहायला मिळतं.

  • -MIN READ Karnataka
  • Last Updated :

बंगळुरू 07 जानेवारी : सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बेंगळुरूमधील अमृता हल्लीचा आहे, ज्यामध्ये एका महिलेला पुजारी मंदिरातून बाहेर ओढताना दिसत आहे. इतकंच नाही तर पुजारी महिलेला मारहाणही करत आहे. ही घटना 21 डिसेंबरची असली तरी ती आता समोर आली आहे. या महिलेला अशाप्रकारे मंदिरातून बाहेर काढण्यात आलं कारण ती भगवान व्यंकटेश्वराची पत्नी असल्याचा दावा करत होती आणि तिला त्यांच्या मूर्तीजवळ बसायचं होतं. जिममध्येच मृत्यूनं गाठलं; वर्कआउट करताना अचानक कोसळला अन् 5 सेकंदात गेला जीव, घटनेचा VIDEO ही संपूर्ण घटना लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरातील आहे. हा व्हायरल व्हिडीओ ४४ सेकंदांचा आहे, ज्यामध्ये ती महिला मूर्तीजवळ बसण्याचा हट्ट करताना दिसते. तर मंदिराचा पुजारी तिचे केस पकडून, लाथ मारून, धक्काबुक्की करत तिला मंदिराबाहेर ओढत असल्याचं पाहायला मिळतं. महिलेनं मंदिरात जाण्यासाठी पुन्हा-पुन्हा उठण्याचा प्रयत्न केला असता पुजार्‍याने तिला चापट मारून खाली पाडलं, त्यानंतर एक व्यक्ती काठी घेऊन आला, त्यानंतर ही महिला पळून गेली.

News18लोकमत
News18लोकमत

मंदिरात उपस्थित पुजार्‍यांचा दावा आहे की, जेव्हा त्यांनी तिला मूर्तीजवळ बसू दिलं नाही तेव्हा तेव्हा ती महिला त्यांच्यावर थुंकली. महिलेनं मूर्तीशेजारी बसण्याचा आग्रह धरल्याने तिला हाकलून देण्यात आलं. मात्र पुजारी ज्या पद्धतीने तिला बाहेर ओढत आहेत, त्यावरून सोशल मीडियावर टीका होत आहे. विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका करणारा शंकर मिश्रा अखेर अटकेत, आरोपीच्या वकिलाचे पीडितेवर गंभीर आरोप ही घटना घडली त्यावेळी पुजाऱ्यासोबतच आणखी तीन लोक, ज्यापैकी दोन जण पुजार्‍यासारखे कपडे घातलेले आहेत, गर्भगृहात उपस्थित होते. परंतु त्यापैकी कोणीही पुजाऱ्याला रोखण्याचा किंवा महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. पोलिसांनी पुजाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पुजारी मुनीकृष्णाविरुद्ध भादंवि कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात