मराठी बातम्या /बातम्या /Viral /बापरे! अस्वलाने प्रेग्नंट महिलेला जमिनीवर आपटलं; सर्कसमधील भयंकर हल्ल्याचा VIDEO

बापरे! अस्वलाने प्रेग्नंट महिलेला जमिनीवर आपटलं; सर्कसमधील भयंकर हल्ल्याचा VIDEO

सर्कसमध्ये अस्वल हिंसक बनला आणि त्याने प्रेग्नंट महिलेवर हल्ला (Bear attack on pregnant woman) केला.

सर्कसमध्ये अस्वल हिंसक बनला आणि त्याने प्रेग्नंट महिलेवर हल्ला (Bear attack on pregnant woman) केला.

सर्कसमध्ये अस्वल हिंसक बनला आणि त्याने प्रेग्नंट महिलेवर हल्ला (Bear attack on pregnant woman) केला.

मॉस्को, 18 ऑक्टोबर : सर्कस (Circus) पाहायला अनेकांना आवडतं.  खळखळून हसवणारे विदुषकाचे खेळ आणि धडकी भरवणाऱ्या चित्तथरारक कसरती पाहायला आपल्याला आवडतं. सिंह, हत्ती, वाघ अशा जंगली प्राण्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना सर्कसमध्ये आणलं जातं. काही देशांमध्ये सर्कसमध्ये प्राण्यांवर बंदी आहे, पण तरी काही देशांमध्ये सर्कसमध्ये असे जंगली प्राण्यांचे खेळ दाखवले जातात. जरी त्यांना प्रशिक्षण दिलेलं असलं तरी शेवटी ते जंगली प्राणीच. कधी काय करतील याचा नेम नाही (Animal attack on trainer in cirus). त्यामुळे प्रेक्षकांसह अगदी या प्राण्यांचे ट्रेनरही जीव मुठीत धरूनच असतात. सध्या सर्कसमधील असाच एक खतरनाक व्हिडीओ (Circus shocking video) सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) होतो आहे. जिथं एका अस्वलाने चक्क प्रेग्नंट महिला  ट्रेनरवर (Bear attacked on pregnant trainer in circus) हल्ला केला आहे.

रशियातील (Russia) ओरिओल (Oryol) शहरातील  (Russian Circus Video) धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे (Bear Attack Woman). ज्यात सर्कममध्ये अस्वल आपल्या कसरती दाखवताना दिसत आहेत. त्याचवेळी प्रेग्नंट महिला ट्रेनर अस्वलाजवळ येते. त्याचवेळी अस्वल हिंसक होतं आणि महिलेवर हल्ला करतं. त्या महिलेचं पोटच आपल्या दोन्ही हातात धरतं आणि तिला जमिनीवर आपटतं.

हे वाचा - Circus चा खेळ पडला उलटा! 2 सिंहांनी ट्रेनरचेच पाय धरले आणि...; खतरनाक VIDEO

व्हिडीओत पाहू शकता निळ्या रंगाचा ड्रेस घातलेली ही तीच महिला आहे. ती अस्वलाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते. पण अस्वल इतका हिंसक बनतो की तो तिला पकडतो आणि तिला खाली फेकतो. त्यावेळ इतर ट्रेनर महिलेच्या मदतीला धावून आले. त्यांनी कसंबसं करून ट्रेनर महिलेला अस्वलाच्या तावडीतून सोडवलं आणि तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

" isDesktop="true" id="619719" >

सर्कस पाहायला आलेल्या प्रेक्षकांनी सांगितल्यानुसार अस्वल पिंजऱ्यात बंद होता, तेव्हापासूनच तो राहात होता.  महिलेने सांगितल्यानुसार, ती प्रेग्नंट असल्यामुळे अस्वल चिडचिड करत होतं. अस्वलाने हल्ला केल्यामुळे तिला जखमा झाल्या, दुखापत झाली पण ती आणि तिचं बाळ पूर्णपणे ठीक आहे. पण हल्ल्यानंतर अस्वल शांत झाला आणि त्याने महिलेला पुन्हा मिठी मारली.

हे वाचा - पंगा घेणं आलं कुत्र्याच्या अंगाशी; मांजरीनं अद्दल घडवताच ठोकली धूम, पाहा Video

याआधीही रशियातील अशाच एका सर्कसमध्येही अस्वलाने हल्ला केला होता. हरलेक्विन ट्रॅवलिंग सर्कसमधील (Harlequin Travelling Circus) हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हे अस्वल टोपी आणि स्कार्फ घालून रिंगमध्ये प्रवेश करतं आणि अचानक समोर उभा असलेल्या ट्रेनरवर हल्ला करतं. तो महिलेचे पाय आपल्या पंजानं पकडतो आणि तिला चावण्याचा प्रयत्न करतो. महिलेला वाचवण्यासाठी तिथे उपस्थित असलेले इतर दोन ट्रेनर अस्वलाला दूर करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तरीही अस्वल तिला सोडत नाही. मात्र, काही वेळानंतर या महिलेला अस्वलाच्या तावडीतून सोडवलं जातं.

" isDesktop="true" id="619719" >

हे सगळं इथेच संपत नाही. कारण इतकं सगळं होऊनही शो पुढेही सुरू राहतो. महिला ट्रेनर दुसऱ्यांदा पुन्हा या अस्वलासमोर परफॉर्म करण्यासाठी जाते आणि अस्वल पुन्हा तिच्यावर हल्ला करतं. दुसऱ्यांदा हल्ला होऊनही शो तसाच सुरू राहतो आणि सगळं ठरल्याप्रमाणं सुरू असतं. अशात हे अस्वल तिसऱ्यांदा पुन्हा हल्ला करतं. हे सर्व दृश्य पाहून सर्कस पाहण्यासाठी आलेल्या सर्वांनाच धक्का बसतो.

First published:
top videos

    Tags: Viral, Viral videos, Wild animal