मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बॉलने केला बाईकस्वारांचा 'गोल'; भयंकर अपघाताचं दृश्य CCTV मध्ये कैद

बॉलने केला बाईकस्वारांचा 'गोल'; भयंकर अपघाताचं दृश्य CCTV मध्ये कैद

भरधाव बाईकसमोर बॉल आला आणि...

भरधाव बाईकसमोर बॉल आला आणि...

भरधाव बाईकसमोर बॉल आला आणि...

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 17 ऑक्टोबर : किती तरी लोकांना खेळाचं इतकं वेड असतं की अगदी मैदान सोडून ते रस्त्यावरही खेळताना दिसतात. क्रिकेट असो वा फुटबॉल कुठेही आणि कधीही ते खेळण्यापासून काही जण स्वतःला रोखू शकत नाहीत. पण त्यांचा हा रस्त्यावरील गेम इतरांंना मात्र महागात पडू शकतो. सध्या असाच एक व्हिडीओ (Bike accident video) समोर आला आहे (Ball hit bike). रस्त्यावर बॉलमुळे बाईकस्वारांचा गोल झाला आहे. बॉलमुळे बाईकला अपघात झाला. बाईक घसरून पडली आणि अपघाताचं हे भयंकर दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) झाला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक तरुण रस्त्यावर बॉलसोबत खेळत जातो आहे. त्याच्या हातातून बॉल सुटतो आणि तो रस्त्याच्या मधोमध जातो. इतक्यात तरुणाच्या मागच्या दिशेने बाईक येते. बॉल बाईकच्या मध्ये येतो आणि बाईकस्वाराचं बाईकवरील नियंत्रण ढासळतं. बाईक धाडकन कोसळते. या बाईकवर दोन तरुण बसलेले आहेत. तेसुद्धा जमिनीवर आपटतात. हे वाचा - OMG! झटपट हेअर कटिंगचा असा जुगाड, काही सेकंदातच निम्मे केस गायब; पाहा VIDEO सुदैवाने दोघांनीही काही गंभीर दुखापत झालेली दिसत नाही. बाईक घसरून पुढे गेल्यामुळे त्यांना फार दुखापत झाली नाही. दोघंही स्वतःच उठतात. पण त्यांना बॉल खेळणाऱ्या तरुणाचा खूप राग आलेला दिसतो. होल्ड माय बिअर ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
First published:

Tags: Accident, Bike accident, Viral, Viral videos

पुढील बातम्या