मराठी बातम्या /बातम्या /Viral /...अन् बाईंचा सुटला ताबा; स्टेजवर येत शिक्षिकेचा विद्यार्थ्यांना 'चुम्मा'; VIRAL झाला VIDEO

...अन् बाईंचा सुटला ताबा; स्टेजवर येत शिक्षिकेचा विद्यार्थ्यांना 'चुम्मा'; VIRAL झाला VIDEO

शिक्षिकेचा डान्स व्हिडीओ

शिक्षिकेचा डान्स व्हिडीओ

बिनधास्त शिक्षिकेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 25 मार्च : शिक्षिका म्हटलं की कडक शिस्तीची महिला असंच चित्र आपल्या डोळ्यासमोर येंत. पण सध्या एका शिक्षिकेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या शिक्षिकेने विद्यार्थ्यांसमोर असं काही केलं की व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. जो प्रचंड धुमाकूळ घालतो आहे. शिक्षिकेला असं काही करताना पाहून अनेक जण हैराण झाले आहेत.

शाळेच्या एका कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे. ज्यात शिक्षिकेने असं काही केलं, ज्याची कुणी अपेक्षाही केली नसेल. कार्यक्रमात असं काही झालं की शिक्षिका आऊट ऑफ कंट्रोल झाली. ती धावत स्टेजवर गेली आणि विद्यार्थ्यांना तिने चक्क चुम्मा दिला आहे. शिक्षिकेचं असं रूप पाहून विद्यार्थीही वेडावले. तेसुद्धा मोठमोठ्याने ओरडताना ऐकू येतं आहे.

'मला नापास केलं तर मोदींना...', बोर्डाच्या विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका पाहून शिक्षक हादरला

व्हिडीओ तुम्ही पाहाल सुरुवातीला ही शिक्षिका विद्यार्थ्यांना फ्लाइंग किस देताना दिसते आहे. मागून चुम्मा चुम्मा असं गाणं ऐकू येतं. थोड्या वेळाने शिक्षिका या गाण्यावर डान्स करताना दिसते. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या हम फिल्ममधील चुम्मा चुम्मा हे गाणं, ज्यावर ती थिरकली. या गाण्यातील बिग बी यांची सिग्नेचर स्टेप ही शिक्षिका करते.

अनेक लोक असे आहेत, ज्यांना डान्सचं प्रशिक्षण नसलं तरी डान्सची हौस मात्र असते. मग गाणं लागलं की त्यांचं शरीर थिरकू लागतं. काही जण तर गाणं लागल्यानंतर आऊट ऑफ कंट्रोलच होतात. अशाच लोकांपैकी एक ही शिक्षिका. जिने शाळेच्या कार्यक्रमात गाणं ऐकलं आणि ती स्वतःला रोखू शकली नाही.

सुरेल गाणं गाणारं गाढव कधी पाहिलंय का? पुन्हा पुन्हा ऐकावा, पाहावासा वाटेल असा VIDEO

pritykeshar इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. शिक्षिकाचा डान्सिंग अंदाज तुफान व्हायरल होतो आहे.

हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. कित्येक जण शिक्षिकेच्या डान्सचे फॅन झाले आहेत. कुणी त्यांना क्युट म्हटलं आहे तर कुणी शानदार. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

First published:
top videos

    Tags: Dance video, School, Student, Teacher, Viral, Viral videos