नुकत्याच काही राज्यांच्या बोर्डाच्या परीक्षा झाल्या. शिक्षकांनी आता पेपर तपासण्याचं काम सुरू केलं आहे. काही विद्यार्थ्यांनी परीक्षेत असं काय काय लिहिलं आहे ज्याचा कुणी विचारही केला नसेल. एका शिक्षकाने नाव न सांगण्याच्या अटीवर विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत काय काय लिहिलं आहे, याचा खुलासा केला आहे. शॉकिंग म्हणजे या विद्यार्थ्याने पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यांच्या नावाने धमकी दिली आहे. एका विद्यार्थ्याने इतिहासाच्या पेपरमध्ये माझे नेता नरेंद्र मोदी आहेत. त्यांनी 1857 सालापासून आतापर्यंत सर्व युद्ध, आंदोलनं जिंकलीत. याशिवाय आपल्याला दुसऱ्या कुणाबाबत काहीच माहिती नाही, असं म्हटलं आहे. तर एकाने जर मला नापास केलं तर मी मोदीजी आणि योगीजींकडे तुमची तक्रार करेन. तुमची नोकरीही धोक्यात येऊ शकते, अशी शिक्षकाला धमकीच दिली आहे. हा सर्व प्रताप उत्तर प्रदेश म्हणजे यूपी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा आहे.