मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - अतिउत्साह पडला महागात! एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत असं काही केलं की मास्तरांनी चोप चोप चोपलं

VIDEO - अतिउत्साह पडला महागात! एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत असं काही केलं की मास्तरांनी चोप चोप चोपलं

शिक्षकाची विद्यार्थ्याला मारहाण.

शिक्षकाची विद्यार्थ्याला मारहाण.

शिक्षक आणि विद्यार्थ्याचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Priya Lad

मुंबई, 04 नोव्हेंबर : आपल्या प्रिय व्यक्तीने काहीतरी चांगलं करून दाखवलं की त्याचं कौतुक वाटतं. अगदी मित्रमैत्रिणीही याला अपवाद नाहीत. मग त्यांचं कौतुक करण्याच्या उत्साहात कुणी जोरात टाळ्या वाजवतं तर काही जणांना तर तुम्ही शिट्टी वाजवतानाही पाहिलं असेल. पण काही ठिकाणी असा उत्साह चांगलाच महागात पडू शकतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका शालेय कार्यक्रमात एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत उत्साहात असं काही केलं की शिक्षकांनी त्याला चांगलाच चोप दिला आहे.

एका शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्याचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. अवघ्या काही सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. पण पाहिल्यानंतर तुम्ही पोट धरून हसाल.  व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एखाद्या शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असल्याचं दिसतं आहे.  स्टेजवर एक विद्यार्थी आणि शिक्षक आहेत. शिक्षक स्टेजच्या एका बाजूला उभे आहेत. तर विद्यार्थी स्टेजच्या मध्ये आहे. विद्यार्थी गाण्यावर डान्स करतो आहे. सर्व जण त्याच्याकडे कुतूहलाने पाहत आहेत. इतक्यात दुसरा विद्यार्थी स्टेजवर येतो आणि डान्स करणाऱ्या विद्यार्थ्याच्या जवळ जातो. त्यानंतर हा विद्यार्थी त्या विद्यार्थ्यासोबत जे करतो ते धक्कादायक आहे.

हे वाचा - 6 सेकंदात 6 वार! भरबाजारात चपलेने धुलाई करत बायकोने नवऱ्याचं तोंड केलं लाल; पाहा VIDEO

स्टेजवर आलेल्या दुसऱ्या विद्यार्थ्याच्या हातात पैशांच्या नोटा आहेत. तो हातात नोटा धरून डान्स करणाऱ्या विद्यार्थ्याभोवती ओवाळतो. जसं एखाद्या कार्यक्रमात कुणावर तरी पैसे ओवाळून टाकावेत तसा हा विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत करतो आहे.

कदाचित हे दोघं मित्र असावेत. आपल्या मित्राचा डान्स पाहून मित्राला इतका आनंद झाला की त्याचं स्वतःवर कंट्रोल राहिलं नाही आणि त्याने शाळेच्या कार्यक्रमातच असं काही तरी केलं आहे. पण त्याचा हा उत्साह मात्र त्याच्या शिक्षकांना रूचला नाही.

व्हिडीओत तुम्ही पुढे पाहाल तर विद्यार्थी जसा स्टेजवरून खाली येतो, तसे शिक्षक त्याला धरतात आणि त्याला मारताना दिसतात. इतर महिला शिक्षक त्या शिक्षकांना शांत कऱण्याचा प्रयत्न करतात पण ते कुणाचंच ऐकत नाहीत. विद्यार्थ्याच्या मानेला धरतात आणि त्याला कार्यक्रमातून बाहेर घेऊन जातात. पण डान्स करणारा विद्यार्थी मात्र आपलं नाचणं काही थांबवत नाही.

हे वाचा - VIDEO - ती ढसाढसा रडत होती तरी तिचे हातपाय धरून तिला...; नवरीसोबत मंडपात धक्कादायक प्रकार

हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. @HasnaZarooriHai  ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट कऱण्यात आला आहे. मोठा चौधरी बनत होता, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

व्हिडीओवर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

First published:

Tags: Student, Teacher, Viral, Viral videos