जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 6 सेकंदात 6 वार! भरबाजारात चपलेने धुलाई करत बायकोने नवऱ्याचं तोंड केलं लाल; पाहा VIDEO

6 सेकंदात 6 वार! भरबाजारात चपलेने धुलाई करत बायकोने नवऱ्याचं तोंड केलं लाल; पाहा VIDEO

पत्नीकडून पतीला चपलेने मारहाण.

पत्नीकडून पतीला चपलेने मारहाण.

नवरा-बायकोत काही कारणावरून झालेला हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. महिलेने रस्त्यातच आपल्या पतीला चपलेने चोपलं.

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

लखनऊ, 03 ऑक्टोबर :  नवरा-बायको म्हटलं की भांडणं आलीच. अशाच एका दाम्त्यामधील वाद चव्हाट्यावर आला आहे. घरगुती वाद हामाणारीपर्यंत पोहोचला. रस्त्यावर येत बायकोने नवऱ्याची चांगलीच धुलाई केली आहे. भरबाजारात महिलेने आपल्या पतीला चपलेने मारलं आहे. फक्त 6 सेकंदात चेहऱ्यावर चपलेने तब्बल 6 वार करत तिने त्याचं तोंड लाल केलं आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातील ही घटना आहे. एका महिलेने भरबाजारात आपल्या नवऱ्याची धुलाई केली आहे. हा हायवोल्टेज ड्रामा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी जमली. तिथं उपस्थित लोकांनी या घटनेचा व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. हे वाचा -  VIDEO - बायको आणि गर्लफ्रेंड एकमेकींना भरस्त्यात भिडल्या; नवऱ्याने रागात तिथंच दोघींनाही… व्हिडीओत तुम्ही पाहू शकता बरीच गर्दी जमली आहे. दोन महिला एका व्यक्तीसमोर उभ्या आहेत. एक महिला त्या व्यक्तीला मारताना दिसते आहे. आपल्या पायातील चप्पल काढून ती त्या व्यक्तीला मारते. त्याच्या तोंडावर सटासट चपलेने वार करते. अवघ्या ६ सेकंदात महिला ६ वेळा त्याच्या तोंडावर चप्पलेने मारते. मिळालेल्या माहितीनुसार दामप्त्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून काही कारणामुळे वाद सुरू आहेत. हाच वाद इतका विकोपाला गेला की महिलेच्या रागाचा पारा चढला. तिचा राग रस्त्यावर उफाळून आला आणि भररस्त्यात तिने आपल्या नवऱ्याला चपलेने चोपून काढलं. यावेळी तिथं असलेली दुसरी महिला की या महिलेची आई असल्याचं सांगितलं जातं आहे. महिला पतीला मारत असल्याचं हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर हे प्रकरण शांत झालं. हे वाचा -  नवरा घरकाम करत नाही म्हणून तक्रार पडली महागात; बायकोच पोहोचली तुरुंगात एशियानेट हिंदी च्या वृत्तानुसार पोलिसांनी सांगितलं की, या दाम्पत्याचं प्रकरण कोर्टात आहे. त्यांच्यात वाद सुरू आहेत. कोर्टातून घरी येताना दोघंही एकाच बसमध्ये होते. त्यावेळी त्यांच्यात काही कारणावरून वाद सुरू झाला. वाद हाणामारीपर्यंत पोहोचला.

जाहिरात

@MishraAnanya3 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात