मुंबई, 02 नोव्हेंबर : लग्नाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही मजेशीर, काही भावुक असतात. असाच लग्नाचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. लग्न झाल्यानंतर भरमंडपातच नवरीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. नवरीसोबत सर्वांनी असं काही केलं आहे, पाहून तुम्हीसुद्धा शॉक व्हाल.
लग्नाचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ जितका फनी आहे तितकाच शॉकिंगही आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही हैराण व्हाल, तुम्हाला धक्का बसेल पण तुम्हाला हसूही आवरणार नाही. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता लग्नमंडप दिसतो आहे, लग्नात आलेले पाहुणेही जमले आहेत. सर्वांचं लक्ष लग्नमंडपाच्या प्रवेशद्वारावर आहे. तिथून गर्दी येताना दिसते. एका व्यक्तीला धरून आणलं जातं आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नाही तर चक्क नवरीबाई आहे. कुणी नवरीचे हात धरले आहेत, तर कुणी तिचे पाय धरले आहेत आणि नवरी ढसाढसा रडते आहे.
हे वाचा - बापरे! धगधगत्या आगीत नवरा-नवरीचा 'रोमान्स'; Wedding Video पाहून सर्वांना फुटला घाम
ओक्शाबोक्शी रडणाऱ्या नवरीला धरून एका गाडीपर्यंत आणण्यात आलं आहे. तिथं असलेली एक महिला गाडीचा दरवाजा उघडते आणि तिला धरून सर्वजण त्या गाडीत बसवतात.
लग्नातील मुलीच्या पाठवणीचं हे दृश्य. सामान्यपणे आनंदात लग्नसोहळा पार पाडल्यानंतर जेव्हा नवरीमुलीच्या पाठवणीचा क्षण येतो तेव्हा सर्वांनाच रडू कोसळतं. नवरी आणि तिच्या माहेरची माणसं भावुक होतात. नवरी आपल्या प्रिय व्यक्तींना मिठी मारून रडताना दिसते. पण या व्हिडीओतील दृश्य मात्र वेगळं आहे. नवरी रडते तर आहे पण मिठी मारून नव्हे तर तिला सर्वांनी धरलं आहे.
हे वाचा - VIDEO - नवरीसमोर अति उत्साह, जोश पडला महागात; लग्नाच्या दिवशीच नवरदेव रुग्णालयात
एकंदर व्हिडीओ पाहिल्यानंतर तिच्या मनाविरुद्ध लग्न लावून तिची जबरदस्ती पाठवणी केली जाते असं दिसतं आहे. नवरीचे नातेवाईक तिचे हातपाय धरून तिला माहेरून निरोप देत सासरी पाठवत आहेत.
View this post on Instagram
इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर लोक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marriage, Viral, Viral videos, Wedding