नवी दिल्ली, 11 जानेवारी : सध्या हिवाळा सुरु असून बऱ्याच ठिकाणी कडाक्याची थंडी पहायला मिळतेय. थंडीमुळे लोक बाहेर पडायचं टाळतायेत आणि पडलेच तर गरम आणि उबदार कपडे घालतायेत. थंडीच्या दिवसांमध्ये चहाची ओढ जरा जास्तच असते. हिवाळ्यात लोक जास्त चहा पितात. त्यामुळे चहाच्या दुकानाबाहेर तुफान गर्दी पहायला मिळते. अशातच आजकाल चहावालेही अनोख्या स्टाईलमध्ये चहा विकताना दिसतात. हटक्या स्टाईलमध्ये ते चहा विकताना दिसतात. मात्र कधी कधी ही स्टाईल अंगलट येतानाही दिसून येते.
हटक्या स्टाईलमध्ये चहा विकणं चहा विक्रेत्याला चांगलंच महागात पडलं असून या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला चहा विकत आहे. तो अनोख्या अंदाजात चहा पॅक करुन देताना दिसत आहे. मात्र ही स्टाईल त्याला महागात पडली. चहा विकणारी व्यक्ती ग्राहकांसाठी प्लास्टिकच्या पिशवीत चहा पॅक करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. चहा गरम केल्याने प्लास्टिक फुटून चहा थेट त्या व्यक्तीच्या तोंडावर येऊन पडतो. चहा गरम असल्यामुळे चहा विक्रेता चांगलाच होरपळला. या दरम्यान चहा विकणारी व्यक्ती आपला चेहरा झपाट्याने पुसताना दिसत आहे.
ये कौन सा तरीका है चाय बेचने का... आगे से सावधान रहें... बड़े हादसे को दावत देने जैसा है... pic.twitter.com/bthF2mNepR
— Narendra Singh (@NarendraNeer007) January 10, 2023
सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. नरेंद्र सिंह नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करण्यासोबतच लक्षवेधी कॅप्शनही त्यांनी दिलं आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओवर खूप साऱ्या प्रतिक्रियाही येताना दिसत आहे.
दरम्यान, आपण पाहतो की लोक वेगवेगळ्या प्रकारे चहा बनवतात आणि प्रत्येकाची स्वतःची चव वेगळी असते. चहाप्रेमी तर चहाच्या दुकानांवर तुफान गर्दी करत असतात. मात्र चहा गरम असतो त्यामुळे ग्राहकाला आणि विक्रेत्यालाही विजा होऊ शकते. चहा विकताना कोणताही स्टंट किंवा स्टाईल न करता चहा विकणं गरजेचं आहे. त्यामुळे अशा ठिकाणी सावधान राहण्याची जास्त गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tea, Tea drinker, Top trending, Videos viral, Viral news