Home /News /viral /

OMG! हे कसं शक्य आहे? आधाराशिवायच हवेत लटकतेय भलीमोठी चहाची किटली; अद्भुत VIDEO

OMG! हे कसं शक्य आहे? आधाराशिवायच हवेत लटकतेय भलीमोठी चहाची किटली; अद्भुत VIDEO

हवेत स्थिरावलेल्या चहा किटलीचा हा व्हिडीओ पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.

    मुंबई, 11 मार्च : जगातील सेव्हन वंडर्स तर सर्वांनाच माहिती आहेत. पण याशिवाय अशा बऱ्याच वास्तू, ठिकाणं आहेत जे पाहताच त्यांच्यावरून नजर हटत नाही. त्या वस्तू पाहिल्यानंतर आपला आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाही. सध्या अशाच एका वस्तूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायररल होतो आहे. ती म्हणजे हवते लटकणारी भलीमोठी चहाची किटली (Tea kettle in air video). कोणतीही वस्तू उभी राहण्यासाठी त्याला एक आधार लागतो. पण ही चहाची किटली मात्र कोणत्याही आधाराशिवाय हवेत लटकलेली दिसते (Hanging Teapot Video) . ही किटली पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. हे नेमकं कसं शक्य आहे, असाच प्रश्न सर्वांना पडला आहे. हा व्हिडीओ पाहाल तर भलीमोठी किटली हवेत एका जागी स्थिर आहे, तिला दुसरा कोणताच आधार दिसत नाही. तशी ही चहाची किटली असली तरी त्यातून पाणी पडतं आहे. किटली हवेत अशी कशी काय राहिली, त्यातून इतकं पाणी सलग कसं येतं आहे, असे बरेच प्रश्न तुम्हाला पडले असतील. हा व्हिडीओ म्हणजे एक ऑप्टिकल इल्युजन म्हणजे दृष्टीभ्रम आहे. याचा अर्थ आपल्या डोळ्यांना जे दिसतं तसंच नसतं. आपण जे पाहतो त्यापेक्षा दुसरंच काहीतरी असतं. काही कारणामुळे त्याच्या दुसऱ्या बाजूवर आपलं लक्ष जात नाही किंवा ती आपल्याला पटकन, सहजासहजी दिसत नाही. हे वाचा - OMG! हँडलवर उभं राहून चालवली सायकल; Cycling Video पाहूनच तोंडात बोटं घालाल जसं तुम्हाला दिसतं तशी ही किटली कोणत्याही आधाराशिवाय हवेत लटकली आहे, तर तसं बिलकुल नाही. ही किटली एका आधारावरच उभी आहे, एका पाइपच्या आधारावर. तुम्ही जर व्हिडीओ नीट पाहिला तर या किटलीतून वाहणाऱ्या पाण्याच्या धारेत एक पाइप आहे आणि हा पाइप या किटलीपर्यंत जातो. ज्यावर ही किटली हवेत स्थिर राहिली आहे आणि याच पाइपमधून पाणी येतं आहे. पाहणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष या किटलीकडे आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याकडे जातं. पण पाण्याच्या प्रवाहामुळे म्हणा की सहजासहजी दिसत नाही म्हणून म्हणा त्यातील पाइपकडे लक्ष जात नाही किंवा तो पटकन दिसत नाही. हे वाचा - Shocking! अचानक स्ट्रेचरवर उठून बसला 'मृतदेह'; शवगृहातील थरकाप उडवणारा VIDEO Hangover नावाच्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तसा हा व्हिडीओ जुना आहे. पण पुन्हा चर्चेत आला आहे. काही लोकांनी हा व्हिडीओ अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील तर काहींनी चीनमधील असल्याचं म्हटलं आहे. नेमका हा व्हिडीओ कुठला आहे माहिती नाही. कारण असे फाऊंटन बऱ्याच देशांमध्ये आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Shocking viral video, Viral, Viral videos

    पुढील बातम्या