मुंबई, 10 मार्च : सायकल चालवणं जितकं सोपं वाटतं तितकं सोपं नाही. सायकलवर बॅलेन्स करणं म्हणजे सर्वात कठीण काम. हँडल हातात धरूनच सायकल चालवताना कितीतरी जण डगमगतात. त्यांचा तोल जातो आणि सायकलवरून धाडकन कोसळतात (Cycling stunt video). पण एका व्यक्तीने मात्र चक्क हँडलवर उभं राहून सायकल चालवून दाखवलं आहे (Man standing on handle). सोशल मीडियावर स्टंटचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच सायकलवरल हा स्टंटचा खतरनाक व्हिडीओ आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती सायकलच्या हँडलवर उभं राहून सायकल चालवताना दिसला. व्यक्तीने सायकलवर उभं राहून ज्या पद्धतीने सायकलिंग केलं आहे आणि सायकलवर नियंत्रण केलं आहे, ते खूपच सर्वजण थक्क झाले आहेत. खरंच असं शक्य आहे का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. हे वाचा - Shocking! अचानक स्ट्रेचरवर उठून बसला ‘मृतदेह’; शवगृहातील थरकाप उडवणारा VIDEO व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती सायकलवर उभी राहते. किंबहुना ती सायकलच्या हँडलवर उभी राहते. सायकलच्या हँडलवर उभं राहून सायकलिंग करत ही व्यक्ती रॅम्पवर येते. त्यावेळी व्यक्तीचा तोल थोडा ढासळताना दिसतो. ही व्यक्ती पडणारच असं वाटतं. तसंच फार वेळ ही व्यक्ती अशी सायकलिंग करूच शकणार नाही, असं वाटतं. पण असा विचार करणाऱ्या सर्वांना ही व्यक्ती मोठा धक्का देते.
किती तरी वेळ ही व्यक्ती अशाच पद्धतीने सायकलिंग करते. त्यातही शॉकिंग म्हणजे ही अशी सायकलिंग एका सरळ रेषेत करत नाही. तर वळणदार मार्गावरही करताना दिसते. बराच वेळ असा सायकल चालवल्यानंतर सायकल पडते पण ही व्यक्ती मात्र पडत नाही. ती तशीच उभी राहते. हे वाचा - VIDEO - तहानलेला होता साप; तरुण स्वतःच्या हाताने पाणी पाजायला गेला आणि… इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्यक्तीच्या जबरदस्त बॅलेन्सिंगला सर्वांनी दाद दिली आहे. त्याचं कौतुक केलं आहे.