लंडन, 09 मार्च : हॉरर फिल्ममध्ये (Horror film) मृतदेहाची हालचाल होणं, मृतदेह अचानक उठून बसणं असे सीन तुम्ही पाहिलेच असतील. मुव्हीमध्येच असे भयावह सीन (Horror scene) पाहताना आपल्याला अक्षरशः घाम फुटतो. मग असं काही तुमच्यासमोर प्रत्यक्षात घडलं तर काय होईल. फक्त कल्पनेच तुमच्या अंगाचं पाणी पाणी झालं ना. एका व्यक्तीसोबत असं प्रत्यक्षात घडलं. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Dead body jumps in morgue house). यूकेतील एका शवगृहातील थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये शवगृहाच्या सुरक्षासमोर भयंकर प्रकार घडला. सुरक्षारक्षक एका मृतदेहाजवळ गेला आणि तो मृतदेह अचानक उठून स्ट्रेचरवर बसला. त्यावेळी सुरक्षारक्षकाला हार्ट अटॅक येणंच बाकी राहिलं. व्हिडीओ पाहून तर आपल्याला धडकी भरते. T Cribb & Sons नावाच्या शवगृहातील ही घटना आहे. व्हिडीओत पाहू शकता स्ट्रेचरवर दोन मृतदेह दिसत आहे. एक महिला आणि दोन पुरुष यामध्ये दिसत आहेत. तिघंही आपसात बोलत आहेत. त्यावेळी दोन्ही पुरुष एका मृतदेहाजवळ जातात. एक पुरुष त्या महिलेसोबत बोलत असतो. त्यावेळी दुसरा पुरुष एक डेडबॉडी बॅग खोलतो आणि महिलेशी बोलणारा पुरुष त्या मृतदेहाजवळ जातो तेव्हा अचानक त्या बॅगेतील मृतदेह उठून स्ट्रेचवर बसतो. व्हिडीओ पाहून आपल्याही हृदयाची धडधड वाढते. हे सर्वकाही खरंच आहे असं काही क्षण वाटतं. पण हा खरंतर प्रँक आहे. हे वाचा -
बापरे! ‘या तरुणीच्या सुंदर ओठांमुळे देश धोक्यात’, PHOTO पाहताच लोक दहशतीत
शवगृहाच्या सुरक्षारक्षकासोबत इथल्या स्टाफने हा खतरनाक प्रँक केला. कर्मचारी इतर मृतदेहांप्रमाणे स्ट्रेचवर एका प्लॅस्टिक बॅगेत झोपला. सुरक्षारक्षकाला घाबरवल्यानंतर मृतदेह बनून स्ट्रेचवर बसलेली व्यक्ती आणि तिथं उपस्थित असलेले इतर कर्मचारी मोठमोठ्याने हसू लागले. तेव्हा आपल्यासोबत प्रँक आल्याचं त्या गार्डला समजलं. त्यानंतर ती व्यक्ती सर्वांवर संतप्त झाली. ही संपूर्ण घटना एका सिक्रेट कॅमेऱ्यात कैद करण्यात आली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
हा व्हिडीओ मजेशीर वाटत असला तरी याची गंभीर दखल घेण्यात आली. प्रँक करणाऱ्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याची माहिती मिळते आहे. इतकंच नव्हे तर हा प्रँक करणाऱ्या जितक्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता त्यांनाही निलंबित करण्यात आलं आहे. हे वाचा -
अदृश्य मुलीच्या प्रेमात पडला, बोलत होती पण दिसत नव्हती तरी जुळवलं तुटणारं नातं
द सनच्या रिपोर्टनुसार शवगृहारेच सीनिअर पार्टनर जॉन हर्रिस यांनी सांगितलं, ही खूप गंभीर आणि लज्जास्पद आहे. शवगृहात अशी मस्करी योग्य नाही. त्यामुळे प्रँक करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे भविष्यात असं पुन्हा घडू नये, याचा धडा इतर कर्मचाऱ्यांना मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.