जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - 9 महिन्यांच्या प्रेग्नंट महिलेने घेतली मोठी रिस्क; असं करतब करून दाखवलं की झाला रेकॉर्ड

VIDEO - 9 महिन्यांच्या प्रेग्नंट महिलेने घेतली मोठी रिस्क; असं करतब करून दाखवलं की झाला रेकॉर्ड

VIDEO - 9 महिन्यांच्या प्रेग्नंट महिलेने घेतली मोठी रिस्क; असं करतब करून दाखवलं की झाला रेकॉर्ड

प्रेग्नन्सीच्या नवव्या महिन्यात महिलेने सलग सहा तास असं काही केलं की पाहणारा प्रत्येक जण थक्क झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

चेन्नई, 11 मार्च : प्रेग्नन्सीचा नववा महिना गरोदरणापतील सर्वात महत्त्वाचा टप्पा. या महिन्यात महिलांना विशेष काळजी घ्यावी लागते. प्रसूती कधीही होऊ शकते, बाळ कधीही जन्माला येऊ शकतं, काही समस्या झाली तर गुंतागुंत होऊ शकते त्यामुळे या महिन्यात शक्यतो महिला कोणतीच रिस्क घेत नाहीत. पण तामिळनाडूतील (Tamilnadu) एका महिलेने तशी रिस्क घेतली. तिने असं काही करून दाखवलं ज्याचा रेकॉर्ड झाला आहे (9 Month pregnant woman silambam record). तामिळनाडूच्या तंजावूर जिल्ह्यातील पट्टूकोट्टईजवळील अनैकडूमध्ये राहणारी 29 वर्षांची शीला दास. 9 महिन्यांची गरोदर आहे. ती एक बॉक्सिंग आणि सिलम्बम प्रशिक्षक आहे. बॉक्सिंग आणि वेटलिफ्टिंगमध्ये ते ब्लॅक बॅज होल्डर आहे. वेट लिफ्टिंगचा तिने नॅशनल रेकॉर्ड केले आहे. तिला आयर्न वुमेन (Iron Woman)  ही पदवीही देण्यात आली आहे. तिला प्रेग्नन्सीत सिलम्बमचा रेकॉर्ड करण्याची इच्छा होती. त्याचवेळी अनैकडू सिलम्बम संघाने महिला दिनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये शीलाने आपली ही इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केले. प्रेग्नन्सीच्या अवस्थेत तिने सलग 6 तास सिलम्बमचं प्रदर्शन केलं आणि अखेर रेकॉर्ड केला. तिला नोबेल वर्ल्ड रेकॉर्डचं प्रमाणपत्र देण्यात आलं.  याआधी एका गर्भवती महिलेने 5 तास सिलम्बम कऱण्याचा रेकॉर्ड केला होता. तिचा रेकॉर्ड मोडत शीलाने 6 तासांचा नवा विक्रम रचला आहे. 3 तास एकल आणि 3 तास दुहेरी सिलम्बमचं प्रदर्शन केलं आहे. हे वाचा -  OMG! हँडलवर उभं राहून चालवली सायकल; Cycling Video पाहूनच तोंडात बोटं घालाल पत्रकारांशी बोलताना शीलाने सांगितलं, मी सात वर्षांची असल्यापासून मला खेळाची आवड आहे. सिलम्बम, बॉक्सिंग, कराटेचं प्रशिक्षण घेतलं आहे. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये बरेच पुरस्कार जिंकले आहेत. आता या स्पर्धेत सहभागी होताना मी नऊ महिन्यांची प्रेग्नंट आहे. त्यामुळे मी डॉक्टरांचा सल्ला घेतला, काही टेस्टही केल्या. शारीरिक थकवा विसरून फक्त मानसिक धैर्यामुळेच हे शक्य झालं.

सिलम्बम हे तामिळनाडूतील भारतीय मार्शल आर्ट आहे. सिलम्बू हा तामिळ शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे ध्वनी किंवा आवाज. सिलम्बमचा उल्लेख तामिळ संगम साहित्यात मिळतो. सिलम्बमध्ये एका खास शस्त्राचा वापर केला जातो. हे वाचा -  OMG! हे कसं शक्य आहे? आधाराशिवायच हवेत लटकतेय भलीमोठी चहाची किटली; अद्भुत VIDEO तज्ज्ञांच्या मते, सिलम्बम एक चांगला कार्डिओ व्यायाम आहे. यामुळे हृदय निरोगी राहतं, रक्तप्रवाह चांगला राहतो. वजन आणि कॅलरी कमी करण्यात याची मदत होते. मानसिक ताण आणि थकवा दूर होतो. शरीराला ऊर्जा मिळते. मांसपेशींसाठी उत्तम आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात