मुंबई, 19 ऑगस्ट : मिमिक्री (Mimicry Video) करायला म्हणजे एखाद्याचा आवाज काढण्याचं टॅलेंट (Talent) काही मोजक्याच लोकांकडे असतं. तसं माणसांच्या आवाजाची नक्कल करताना तुम्ही अनेकांना पाहिलं असेल पण प्राणी-पक्ष्यांच्या आवाजाची मिमिक्री करणं म्हणजे कठीणंच. म्हणजे त्यांचा आवाज कसा असतो हे आपण सांगू शकतो. पण हुबेहुब त्यांचा आवाज मात्र नाही काढू शकतं. पण आपल्याला जे अशक्य कठीण वाटतं, ते एका चिमुकल्याने (Kids Video) सहजपणे करून दाखवलं आहे.
कावळ्याचा आवाज कसा असतो तर काव-काव, चिमणीचा आवाज चिव-चिव असं आपण सांगतो. पण या चिमुकल्याकडे असं टॅलेंट आहे की तो पशुपक्ष्यांचा आवाज सांगत नाही तर अगदी काढून दाखवतो (Talented Kid Video). सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणारा चिमुकल्याचा हा व्हिडीओ (Viral Video) पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
फेसबुकवर या मुलाचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती मुलाला पक्ष्यांची, प्राण्यांची नावं सांगत जातो आणि तो त्यांचा अगदी तसाच आवाज काढून दाखवतो.
हे वाचा - खतरनाक बाइक स्टंट करताना तरुणाचा तोल गेला आणि...; पाहा थरारक VIDEO
हा मुलगा कोणत्याही पक्ष्याचा, प्राण्याच्या आवाज हुबेहूब काढतो. म्हणजे तुम्ही जर डोळे बंद केले आणि फक्त आवाज ऐकला, तर एखादा माणूस हा आवाज काढतो आहे हे तुम्हाला समजणारही नाही. एखाद्या खऱ्या पक्ष्याचा, प्राण्याचाच आवाज असावा असं तुम्हाला वाटेल.
हे वाचा - दाखवून द्या तुम्हीच आहात हुश्शार! VIDEO मध्ये मधमाश्यांच्या 'राणी'ला शोधा
इतक्या कमी वयाच या मुलाचं असं टॅलेंट पाहून सर्वजण थक्क झालेत. या मुलाच्या टॅलेंटचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Small child, Viral, Viral videos