मराठी बातम्या /बातम्या /Viral /खतरनाक बाइक स्टंट करताना तरुणाचा तोल गेला आणि...; पाहा थरारक VIDEO

खतरनाक बाइक स्टंट करताना तरुणाचा तोल गेला आणि...; पाहा थरारक VIDEO

खतरनाक बाईक स्टंट महागात

खतरनाक बाईक स्टंट महागात

एका चाकावर तो सुसाट बाईक पळवत होता आणि...

मुंबई, 19 ऑगस्ट : बाईक (Bike) चालवणं अनेकांना आवडतं. त्यातकी काही जणांना तर बाईकवर स्टंट (Bike stunt) करायला आवडतं. कुणी खूप वेगाने बाईक चालवतं, कुणी चालत्या बाईकचं (Bike video) हँडल सोडून देतं, कुणी बाईकवर उभं राहतं, तर कुणी एका चाकावर बाईक पळवतो (Bike stunt video). हे स्टंट इतके खतरनाक असतात की फक्त पाहूनच आपल्याला धडकी भरते. असे स्टंट करताना थोडीसुद्धा चूक झाली तर जीवावरही बेतू (Bike accident) शकतं. सध्या अशाच एका खतरनाक स्टंटचा व्हिडीओ (Stunt video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

भरधाव बाईकवर खतरनाक स्टंट करता करता बाईकस्वाराचं अचानक बाईकवरील नियंत्रण सुटतं. त्याच तोल जातो आणि पुढे जे घडलं ते पाहून तुम्हाला धक्काच बसेल.

व्हि़डीओत पाहू शकता, बाईकस्वार अगदी स्पीडने बाईक पळवतो आहे. तो आपली बाईक दोन नाही तर फक्त एका चाकावर चालवतो आहे. मागच्या एका चाकावर तो सुसाट बाईक पळवताना दिसतो आहे. बरं तो ज्या रस्त्यावर बाईक चालवतो आहे, तिथं इतरही गाड्या येतजात असल्याचं दिसतं आहे.

हे वाचा - दाखवून द्या तुम्हीच आहात हुश्शार! VIDEO मध्ये मधमाश्यांच्या 'राणी'ला शोधा

अचानक या बाईकस्वाराचा तोल ढासळतो आणि तो बाईकच्या एका बाजूने खाली कोसळतो. तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो पण बाईकवरून तो थेट रस्त्याच्या एका कडेला पडतो. बाईक मात्र इतकी वेगात आहे की ती बाईकस्वाराशिवायच आपोआप चालत पुढे जाते. काही अंतरापर्यंत बाईक विनाचालक सुसाट रस्त्यावरून धावते. मग पुढे जाऊन बाईकही धाडकन कोसळते.  सुदैवाने बाईकस्वार रस्त्याच्या कडेला पडला आणि समोरून कोणत्या गाड्या येत नव्हत्या. नाहीतर त्याच्या जीवावरच बेतलं असतं.

हे वाचा - सासरी येताच नववधूने केलं असं काही की नवरदेवही लाजला; पाहा VIDEO

vip.chobbar इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांनी बाईकस्वाराच्या जीवाबाबत चिंता व्यक्त केली आहे. तर काही जणांनी त्याने स्वतःसोबत दुसऱ्यांचाही जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न केल्याचं म्हणत त्याच्यावर टीका केली आहे.

First published:

Tags: Bike accident, Bike riding, Viral, Viral videos