Home /News /lifestyle /

दाखवून द्या तुम्हीच आहात हुश्शार! VIDEO मध्ये मधमाश्यांच्या 'राणी'ला शोधा

दाखवून द्या तुम्हीच आहात हुश्शार! VIDEO मध्ये मधमाश्यांच्या 'राणी'ला शोधा

मधमाश्यांमधून एक राणी मधमाशी शोधण्याचं चॅलेंज सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  मुंबई, 19 ऑगस्ट :  मधमाश्यांपासून (Honeybee) मिळणारं मध (Honey) तुम्ही आवडीने खाता हो की नाही? पण याच मधमाश्यांबाबत (Honeybee video) तुम्हाला किती माहिती आहे? तुम्हाला मधमाश्यांबाबत माहिती असेल तर मग तुम्ही हे चॅलेंज घ्याच. मधमाश्यांमधून एक राणी मधमाशी (Queen bee) शोधून दाखवा. सोशल मीडियावर मधमाश्यांचा हा व्हिडीओ (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. मधमाश्यांचा व्हिडीओ पाहून त्यांच्यातील राणी मधमाशी शोधण्याचं चॅलेंज सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. मधमाशी पालक एरिका थॉम्पसनने हा व्हि़डीओ पोस्ट केला आहे आणि राणी मधमाशी शोधण्याचं चॅलेंज दिलं आहे.
  तुम्ही यामध्ये राणी मधमाशीला शोधू शकता का? इतर मधमाश्यांमध्ये राणी मधमाशी लपली जाईल त्याआधी तिला शोधा, असं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हणण्यात आलं आहे. हे वाचा - पावसाबरोबर संध्याकाळी घरात लाइटभोवती येतात किडे; ‘या’ उपायांनी होणार नाही त्रास या पोस्टमध्ये राणी मधमाशीला शोधण्यासाठी काही हिंटही देण्यात आली आहे. राणी मधमाशी ओळखायची कशी हे सांगण्यात आलं आहे. राणी मधमाशी सर्वात मोठी मधमाशी आहे. तिचं शरीर लांब आणि पातळ असतं. तिचे अनेक रंग असतात. राणी एक सुंदर नारंगी लाल रंगाची आहे. तिच्या पाठीवर एक मोठा काळा डाग असतो. असं वर्णन यामध्ये देण्यात आलं आहे.  या वर्णनाशिवाय पुढे एक फोटोही देण्यात आला आहे, ज्याची मदत तुम्हाला ही माशी शोधण्यात होईल. हे वाचा - शी...! व्हॅनिला फ्लेव्हरची निर्मिती 'यापासून' होते? समजलं तर वापरच बंद कराल! काय मग तुम्हाला सापडली की नाही राणी मधमाशी. सापडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा कुटुंबातल्या सदस्यांना, जवळच्या व्यक्तींना ही बातमी नक्की शेअर करा आणि त्यांनासुद्धा हे चॅलेंज द्या.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Game, Viral, Viral videos

  पुढील बातम्या