मराठी बातम्या /बातम्या /Viral /अबब! भलामोठा अजगर झाला शिकार, 15 फूट लांब किंग कोब्रानं बघताच क्षणी गिळलं

अबब! भलामोठा अजगर झाला शिकार, 15 फूट लांब किंग कोब्रानं बघताच क्षणी गिळलं

साधारणपणे किंग कोब्रा मनुष्यावर विनाकारण हल्ला करत नाही किंवा इजा पोहोचवत नाही.

साधारणपणे किंग कोब्रा मनुष्यावर विनाकारण हल्ला करत नाही किंवा इजा पोहोचवत नाही.

साधारणपणे किंग कोब्रा मनुष्यावर विनाकारण हल्ला करत नाही किंवा इजा पोहोचवत नाही.

देहरादून, 07 मे : सर्वसामन्यपणे सापांमध्ये अजगर हा दुसऱ्या सापांना किंवा प्राण्यांना अगदी माणसालाही गिळत असल्याचं आपल्याला माहिती आहे. अजगर शिकार करतो असं पाहिलं आणि ऐकलं आहे. पण अजगराची शिकार केल्याचं फार दुर्मीळ पाहायला मिळतं. एका सापानं अजगराची शिकार केल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे ऐकून थोडं विचित्र वाटेल पण उत्तराखंडमधील रामनगरमधील कियारी गावातील जंगलात चक्क अजगरचं शिकार झाल्याचा प्रकार घडला आहे. 15 फूट लांब असलेल्या किंग कोब्राने उन्हात झोपलेल्या ड्रॅगनला गिळंकृत केलं. वास्तविक, किंग कोब्रा दिवसा सर्वात जास्त सक्रिय असतो. त्यानं अजगराची शिकार केली आहे.

हा दुर्मीळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. घटनेची माहिती मिळताच वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. या आधी याच भागात किंग कोब्रा सापडला होता. त्याला वाचवल्याचं वन अधिकाऱ्यांनी सांगितलं. आज या कोब्र्यानं इतरांची शिकार करणाऱ्या अजगराचा फडशा पाडला.

" isDesktop="true" id="451904" >

साधारणपणे किंग कोब्रा मनुष्यावर विनाकारण हल्ला करत नाही किंवा इजा पोहोचवत नाही. अशी माहिती वन विभागातील डॉ राकेश नौटियाल यांनी दिली. एकदा त्यांनी खाल्लं की ते 15 ते 50 दिवस काही न खाता राहू शकतात. साधारणपणे किंग कोब्रा बेडूक, मासे, उंदीर, ससे इत्यादी खातो. पण त्याचं खरं भोजन म्हणजे साप. अगदी तो स्वत: च्या प्रजाती किंग कोबरालाही मारून खातो. सर्प जाणकार आणि वन कर्मचाऱ्यांना सर्प वाचविण्याचे प्रशिक्षण देणारे डॉ. अभिषेक म्हणतात की जर पायथन किंग कोबरा पेक्षा किंग कोब्रा छोटा असेल तर त्याची शिकार करून खातो.

हे वाचा-या जवानाला कडक सॅल्युट! लॉकडाऊनमध्ये झाला 2 मुलांचा शिक्षक

संपादन- क्रांती कानेटकर

First published:

Tags: Viral video.