मराठी बातम्या /बातम्या /Viral /हापुस नाही तर हा आहे जगातील सर्वात महागडा आंबा; किंमत ऐकून चक्रावून जाल

हापुस नाही तर हा आहे जगातील सर्वात महागडा आंबा; किंमत ऐकून चक्रावून जाल

हा आंबा दुकानात मिळत नाही तर तो लिलावात विकत घ्यावा लागतो. दरवर्षी याचा लिलाव केला जातो आणि या दोन आंब्याची किंमत 3 लाख रुपयांपर्यंतही पोहोचते.

हा आंबा दुकानात मिळत नाही तर तो लिलावात विकत घ्यावा लागतो. दरवर्षी याचा लिलाव केला जातो आणि या दोन आंब्याची किंमत 3 लाख रुपयांपर्यंतही पोहोचते.

हा आंबा दुकानात मिळत नाही तर तो लिलावात विकत घ्यावा लागतो. दरवर्षी याचा लिलाव केला जातो आणि या दोन आंब्याची किंमत 3 लाख रुपयांपर्यंतही पोहोचते.

मुंबई 14 जून: जगात सर्वांत महाग आंबा (Costliest  Mango in World) कोणता माहीत आहे? हापूस (Alphonso) असं उत्तर अनेकजण देतील पण ते चूक आहे. कारण जगातील सर्वांत महाग आंबा भारतातील नाही तर तो जपानमधील (Japan) आहे. ताईयो नो तामागो (Taiyo no Tamago) असं याचं नावं असून, याची किंमत हजारात नाही तर लाखो रुपयांत आहे. आणि हा आंबा दुकानात मिळत नाही तर तो लिलावात विकत घ्यावा लागतो. दरवर्षी याचा लिलाव केला जातो आणि या दोन आंब्याची किंमत 3 लाख रुपयांपर्यंतही पोहोचते.

पाकिस्तानची मॅंगो डिप्लोमसी :

यंदा  जगातील कोणता आंबा सर्वात रुचकर आणि महाग आहे याचीही जोरदार चर्चा रंगली आणि याला कारण ठरली पाकिस्तानाची (Pakistan) मॅंगो डिप्लोमसी (Mango Diplomacy). परदेशाशी आपले संबंध सुधारण्यासाठी यंदाच्या हंगामात  पाकिस्तानकडून अनेक परदेशी दूतांना आंब्याच्या पेट्या पाठवल्या गेल्या, परंतु बर्‍याच देशांनी त्या स्वीकारल्या  नाहीत. पाकिस्तानचा अगदी जवळचा मित्र देश असलेल्या चीननंदेखील आंबे घेण्यास नकार दिला. त्यामुळं पाकिस्तानची मॅंगो डिप्लोमसी अयशस्वी ठरली, मात्र तिची चर्चा जोरदार झाली. त्यावरून जगातील सर्वांत महाग आणि उत्तम आंब्याची चर्चा झाली.

बापरे! पबच्या छताला लटकल्यात लाखोंच्या खऱ्या नोटा, मात्र चोरी करुनही नाही करता येत खर्च

चवीत भारी हापूस; पण किमतीत जपानी तामागो :

भारतातील अल्फान्सो (Alphonso) किंवा  हापूस हा सर्वांत स्वादिष्ट आंबा मानला जातो. त्याला अक्षरशः स्वर्गीय फळ मानलं जातं. अतिशय सुंदर रंग,  गंध आणि चव असलेल्या या आंब्याला जीआय टॅगही मिळाला असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला मोठी मागणी असते.  युरोप आणि जपानसह अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्येही हापूसची मागणी वाढू लागली आहे. इतकं असलं तरी जगातील सर्वांत महाग आंब्याचा मान  मात्र जपानी आंब्यानं पटकावला आहे. ताईयो नो तामागो नावाचा हा आंबा तिथल्या मियाझरी प्रांतात पिकवला जातो. या आंब्याला गोडव्यासह  अननस आणि नारळाचाही स्वाद असतो. एका विशिष्ट पद्धतीनं याला पिकवलं  जातं.  यामध्ये प्रत्येक फळ झाडावर असतानाच ते जाळीच्या कपड्यानं बांधलं जातं. आंबा झाडावरच पिकू दिला जातो. हे आंबे झाडावरून तोडले जात नाहीत. यामुळे फळाची चव आणि पौष्टिकता कमी होते, असं इथले शेतकरी मानतात. आंबा  पिकल्यावर तो जाळीतच अडकून राहतो. मग ते काढून विक्रीसाठी दाखल केले जातात.  हा आंबा अत्यंत स्वादिष्ट असतो. त्याचा रंग आणि गंधही विलक्षण असतो. त्यामुळे त्याची  किंमतही मोठी असते. हा आंबा बाजारात फळांच्या दुकानात मिळत नाही, तर त्याचा लिलाव होतो. लिलावात सर्वाधिक किंमत देणाऱ्या व्यक्तीलाच हे फळ मिळते. 2017 मध्ये यासाठी 2 लाख 72 हजार रुपये मोजले गेले होते. जपानी संस्कृतीत या आंब्याचे विशेष महत्त्व आहे. हा आंबा सूर्यप्रकाशात पक्व होत असल्यानं त्याला एग ऑफ द सन (Egg of The Sun) असं म्हणतात. इथले लोक गिफ्ट म्हणून हा आंबा देतात. ही भेट मिळणाऱ्याचे नशीब सूर्याइतके चमकते असं मानलं जातं. यामुळे हा आंबा जपानमधील मोठे सण किंवा विशेष प्रसंगी भेट म्हणून  दिला जातो. परंतु ही भेट मिळालेले लोक हा आंबा खात नाहीत तर तो जतन करुन सजवून ठेवतात.

नवरदेवाच्या मित्राचं स्टेजवरच खोडसाळ कृत्य; गिफ्ट पाहून नवरीही लाजली, Video Viral

आतापर्यंत हा आंबा जपानमध्येच तयार होत होता ; पण भारतातील (India) मध्य प्रदेशामधील जबलपूर इथल्या एका  शेतकऱ्यानं या आंब्याचं उत्पादन घेतल्याचा दावा केला आहे. गेल्या तीन वर्षापासून त्याच्याकडील या आंब्याच्या झाडांना फळं येत असून, ती आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवली जात असल्याचंही त्यानं म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Super expensive, Viral