मराठी बातम्या /बातम्या /Viral /बापरे! पबच्या छताला लटकल्यात लाखोंच्या खऱ्या नोटा, मात्र चोरी करुनही नाही करता येत खर्च

बापरे! पबच्या छताला लटकल्यात लाखोंच्या खऱ्या नोटा, मात्र चोरी करुनही नाही करता येत खर्च

पबच्या छताला आणि भिंतींना मिळून तब्बल 2 मिलियन डॉलर म्हणजेच 20 लाख रुपये लटकलेले (Pub Is Decorated With Two Million Dollars) आहेत. हे पैसे चोरीही होतात मात्र ते खर्च करता येत नाहीत.

पबच्या छताला आणि भिंतींना मिळून तब्बल 2 मिलियन डॉलर म्हणजेच 20 लाख रुपये लटकलेले (Pub Is Decorated With Two Million Dollars) आहेत. हे पैसे चोरीही होतात मात्र ते खर्च करता येत नाहीत.

पबच्या छताला आणि भिंतींना मिळून तब्बल 2 मिलियन डॉलर म्हणजेच 20 लाख रुपये लटकलेले (Pub Is Decorated With Two Million Dollars) आहेत. हे पैसे चोरीही होतात मात्र ते खर्च करता येत नाहीत.

नवी दिल्ली 14 जून: पब म्हटलं की लोक मजा-मस्ती करणाऱ्यासाठी आणि डान्ससाठी जातात. मात्र, आज आम्ही तुम्हाला एका अशा पबबद्दल सांगणार आहोत, जिथे लोक खास पैसे पाहाण्यासाठी येतात. आता तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल, की पैशांमध्ये पाहाण्यासारखं काय आहे. मात्र, या पबमधील पैसे खास आहेत. कारण, हा संपूर्ण पब खऱ्या नोटांनी सजला आहे. याच्या छताला आणि भिंतींना मिळून तब्बल 2 मिलियन डॉलर म्हणजेच 20 लाख रुपये लटकलेले (Pub Is Decorated With Two Million Dollars) आहेत. मॅकगुएर यांचा हा आयरिश पब फ्लोरिडामध्ये आहे.

पैसों के लिए कुछ भी! तलावात दिसल्या 500 च्या नोटा, त्याचं झालं असं की...

1977 मध्ये मॅकगुएर आणि त्यांची पत्नी मोली यांनी हे पब सुरू केलं. यावेळी त्यांच्या पत्नीला पहिली टीप म्हणून 1 डॉलर मिळाला. पहिली टीप असल्यानं त्यांनी यावर तारीख लिहित ही नोट पबमध्ये चिटकवली. हे पाहून तिथे येणाऱ्या इतरही ग्राहकांनी टीप देत यावर तारीख आणि आपली सही करुन नोटा याठिकाणी चिटकवण्यास सुरुवात केली आणि हे कलेक्शन वाढतच गेलं.

ब्लॅकमेल करत महिला पोलीस अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार; मुंबईतील संतापजनक घटना

15,000 सक्वेर फूटमध्ये असलेल्या या पबच्या छताला डॉलर लटकवून जागा संपल्यानंतर आता भिंतींनाही नोटा चिटकवण्यात आल्या आहेत. पबच्या मालकानं सांगितलं, की प्रत्येक वर्षी आम्ही हे पैसे मोजतो आणि यासाठी आम्ही करही भरतो. ही आमची संपत्तीच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पबमध्ये असलेला इतका पैसा पाहून तिथे चोरी होणार हे निश्चितच आहे. एकदा पबमधीलच एका कर्मचाऱ्यानं याठिकाणी लटकलेले पैसे चोरले होते, याशिवाय काही ग्राहकांनीही पैसे चोरण्याचा प्रयत्न केला, मात्र या नोटा खऱ्या असूनही त्या खर्च करता येत नाहीत. याचं कारण आहे, यावर काळ्या मार्करनं केलेल्या सह्या आणि लिहिलेला मजकूर. शहरात या पबबाबत सर्वांनाच माहिती असल्यानं या नोटा पाहाताच त्यांची ओळख पटते. यामुळे विक्रेते तात्काळ याबाबतची माहिती पबच्या मालकाला देतात.

First published:
top videos

    Tags: Money, Mumbai Pub, Photo viral