मराठी बातम्या /बातम्या /Viral /भारतीयांच्या टॅलेंटला तोड नाही! इटालीयन पिझ्झाचा देशी अवतार, तुम्हीच पाहा VIDEO

भारतीयांच्या टॅलेंटला तोड नाही! इटालीयन पिझ्झाचा देशी अवतार, तुम्हीच पाहा VIDEO

इटॅलियन डिश पिझ्झासाठी एक (Pizza) म्हण आहे की, प्रेम निराश करू शकतं पण पिझ्झा नाही. देशी पिझ्झा पाहून तुम्ही काय म्हणाल...

इटॅलियन डिश पिझ्झासाठी एक (Pizza) म्हण आहे की, प्रेम निराश करू शकतं पण पिझ्झा नाही. देशी पिझ्झा पाहून तुम्ही काय म्हणाल...

इटॅलियन डिश पिझ्झासाठी एक (Pizza) म्हण आहे की, प्रेम निराश करू शकतं पण पिझ्झा नाही. देशी पिझ्झा पाहून तुम्ही काय म्हणाल...

Viral Video: इटॅलियन डिश पिझ्झासाठी एक (Pizza) म्हण आहे की, प्रेम निराश करू शकतं पण पिझ्झा नाही. गुजरातमधील (Gujarat) सूरत शहरात (Surat) पिझ्झाचंच एक नवं रुप पाहायला मिळत आहे. देशी म्हणा हवं तर..हे पाहून तुम्ही हैराण व्हाल. सूरतमध्ये एका स्ट्रीट-साइड फूड स्‍टॉलवर (Street side Food Stall) मातीच्या कुल्हडमध्ये पिझ्झा (Pizza in Kulhad) दिला जात आहे. देशात पहिल्यांदाच पिझ्झासोबत अशा प्रकारचा प्रयोग करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे. अनेकांनी तर हा देशी पिझ्झा खाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

दोन मिलियनपेक्षा जास्त जणांनी पाहिला व्हिडीओ...

कुल्‍हडमध्ये पिझ्झा सर्व होण्याचा हा व्हिडीओ आमची मुंबई नावाच्या एका यूट्यूूब पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. आता पर्यंत या व्हिडीओला 2 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आणि हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा अनोखा पिझ्झा सूरतमधील प्रसिद्ध स्नॅक्स आऊटलेट कोन चाटने लॉन्च केला आहे. लोकांनी हा व्हिडीओ पाहून मजेशीर कमेंट्सही दिले आहेत.

एका युजरने लिहिलं आहे की, मला भारतीय होण्यावर गर्व आहे. भारतीयांमध्ये इतकं टॅलेंट आहे की, ते कुल्हडमध्येही पिझ्झा बनवू शकतात. तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे की, त्याचा आत्मविश्वास पाहून हैराण झालोय. हा पिझ्झा पाहून इटालियनदेखील खूष होतील.

हे ही वाचा-पहिल्या नजरेत जुळलं प्रेम; लग्नानंतर पत्नीचं गुपित समोर आल्यानंतर पती हादरला!

असा बनवला कुल्हडमध्ये पिझ्झा

" isDesktop="true" id="609307" >

या व्हिडीओमध्ये पाहून शकता की, कुल्हड पिझ्झा (Kulhad Pizza) तयार करण्यासाठी पहिल्यांदा एका वाटीत भाज्या, ब्रेड क्रम्ब्स, मसाले आणि पनीरचं मिक्सचर तयार करण्यात आलं. यासाठी त्याने उकडलेले मक्याचे दाणे, बारीक चिरलेला टोमॅटो, पनीर क्यूब्जसह अनेक सॉससह (मेयोनीज, टोमॅटो केचप आदी) एकत्र केलं. आणि तयार झाला देशी पिझ्झा...

First published:
top videos

    Tags: Gujrat, Pizza, Surat, Viral video.