मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO - अरे देवा! रॅम्पवर पडताच सुपरमॉडेलची ही काय अवस्था झाली; कॅटवॉक सोडा साधं चालणंही विसरली

VIDEO - अरे देवा! रॅम्पवर पडताच सुपरमॉडेलची ही काय अवस्था झाली; कॅटवॉक सोडा साधं चालणंही विसरली

रॅम्पवर पडली मॉडेल

रॅम्पवर पडली मॉडेल

फॅशन शोमध्ये चालता चालता मॉडेल अचानक रॅम्पवर पडली, त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

पॅरिस, 27 जानेवारी : फॅशन शो म्हटलं की रॅम्पवर कॅटवॉक करत येणाऱ्या सुंदर मॉडेल्स समोर येतात. पण काही वेळा या मॉडेल्ससोबत नको तेच घडतं आणि त्याचा व्हिडीओ व्हायरल होतो. अशाच एका फॅशन शोचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. एक मॉडेल कॅटवॉक करताना रॅम्पवर पडली. ती उठली पण त्यानंतर तिला साधं नीट चालतानाही येत नव्हतं. ती चालणंच विसरली.

पॅरिसमध्ये वॅलेंटिनोच्या स्प्रिंग 2023 शोचा हा व्हिडीओ आहे. मॉडेल क्रिस्टन मॅकमेनामी वॅलेंटिनोच्या स्टिलेटोस म्हणजे हाय हिल्स असलेल्या चप्पल घालून चालत होती. पण तिला ते काही जमलं नाही. जशी ती रॅम्पवर चालू लागली. ती धाडकन पडली. ती रॅम्पवर बसलीच. त्यावेळी तिला खूप राग आला होता. तिथले काही लोक तिच्या मदतीसाठी उभे राहिले पण तिने त्यांना थांबवलं. रागात तिने आपल्या पायातील चपला काढल्या हातात धरल्या आणि ती उभी राहिली. चपलांशिवायच ती रॅम्पवर चालू लागली.

हे वाचा - पराठ्याच्या नावाने काहीही! VIDEO पाहून सांगा, आहे का असं काही खाण्याची तुमची तयारी?

पण तिला चालताना पाहिलं तर कॅटवॉक करणारी ही मॉडेल साधं चालणं विसरली की काय असाच प्रश्न तुम्हाला पडेल. तिचे दोन्ही पाय वाकडे झाले आहेत. या वाकड्या पायांनीच ती काही अंतरापर्यंत चालते. थोडं पुढे गेल्यानंतर ती नीट चालते. कदाचित तिच्या पायांना दुखापत झाली असावी.

@PRADAXBBY ट्विटर अकाऊंटवर मायकेला नावाच्या युझरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की मॉडेलच्या चालण्यात चूक नाही. वॅलेंटिनोच्या हिल्समध्ये समस्या आहे. प्रत्येक सिझनमध्ये त्यांच्या चपलांमध्ये अशी गडबड पाहायला मिळते.

हे वाचा - ऑनलाईन मागवलं Sanitary pad पण मिळालं...; पार्सल उघडताच तरुणीला झटका; असं काय होतं पाहा

या व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. चपलांनी मॉडेलची अशी अवस्था केली की ती पायांनी चालणंच विसरली, कदाचित तिला चपला नीट होणार नाहीत हे आधीच सांगून तिला जबरदस्ती घालायला लावल्या असतील, अशा प्रतिक्रिया नेटिझन्सनी दिल्या आहेत.

तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

First published:

Tags: Fashion, Model, Viral, Viral videos