मुंबई, 27 जानेवारी : पराठा म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. थंडीत तर गरमागरम पराठा खाण्याची मजा औरच. पराठा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. साधा पराठा, आलू पराठा, कोबी पराठा, मटार पराठा, लच्छा पराठा एक ना दोन किती तरी प्रकार आहेत. पण सध्या सोशल मीडियावर अशा पराठ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो याआधी तुम्ही कधीच पाहिला नसेल. साधा, लच्छा पराठा सोडला तर बाकी पराठ्यांमध्ये कसलं ना कसलं स्टफिंग असतं. आलू पराठ्यात बटाट्याचं, मटार पराठ्यात मटारचं इत्यादी… पण पराठ्याच्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत असं स्टफिंग भरण्यात आलं आहे, जे पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. हा विचित्र पराठा पाहून तुम्हीही डोक्यावर हात माराल. हे वाचा - Yummy म्हणत Noodles वर ताव मारणाऱ्यांनो हा VIDEO पाहाच; पुन्हा खाण्याचा विचारही करणार नाही ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी खाद्य पदार्थ विक्रेते काही ना काही हटके करण्याचा प्रयत्न करतात. अगदी विचित्र असे फूड एक्सपेरिमेंटही ते करतात.अशाच फूड एक्सपेरिमेंटचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे. काहीतरी हटके करण्याच्या नादात या विक्रेत्याने पराठ्यासोबत जे केलं ते शॉकिंग आहे. व्हिडीओत तुम्ही पाहाल, तर विक्रेता चिप्सचं पाकिट फोडतो. एका भांड्यात ते पूर्ण पाकिट रिकामं करतो. भांड्यात घेतलेले चिप्स तो हाताने कुस्करतो. त्यानंतर मळलेल्या पिठाचा गोळा घेऊन हे कुस्करलेले चिप्स त्या पिठाच्या आत स्टफिंग म्हणून भरतो आणि त्याचे पराठे लाटून ते शेकवून सर्व्ह करतो. हा तयार झाला लेज चिप्स पराठा. हे वाचा - Pizza world record : बाबो! इतका मोठा पिझ्झा की झाला वर्ल्ड रेकॉर्ड; पण तयार केला तरी कसा पाहा VIDEO oye.foodieee इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ही आगळीवेगळी डिश काही लोकांना आवडली आहे तर काहींना नाही. पराठ्याच्या नावाने काहीही बनवलं जात असल्याची प्रतिक्रिया पराठा लव्हर्सनी दिली आहे. काहींनी तर उलटीचे इमोजीही टाकले आहेत.
तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला, ही डीश कशी वाटली, हा चिप्स पराठा खाण्याची तयारी तुमची आहे का? हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.