नवी दिल्ली 19 जानेवारी : कोणासोबत कधी, काय घटना घडेल हे कोणीही सांगू शकत नाही. तुम्ही अनेकदा हे ऐकलं असेल, की 'वाईट वेळ कधीही येऊ शकते, याबद्दल कोणालाही कल्पना नसते.' सोशल मीडियावर सध्या याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले. ज्या पंख्याच्या खाली बसून आपण अगदी आरामात त्याची हवा घेत असतो, तोच पंखा तुमच्यासाठी मोठी समस्या घेऊन येऊ शकतो
(Fan Collapsed in Room), याची कल्पना तुम्ही कधी केली आहे का? सध्या हेच दाखवणारा व्हिडिओ
(Shocking Video Viral) समोर आला आहे.
या पुलावर पोहोचल्यावर कुत्रे आत्महत्या करतात? आजही उलगडलं नाही आहे हे गूढ
सुदैवाने या घटनेत कोणालाही जास्त दुखापत झाली नाही. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की काही लोक रूममध्ये पंख्याची हवा घेत आरामात बसलेले आहेत. मात्र, इतक्यात अशी घटना घडते, ज्याची तिथल्या कोणीही कल्पना केली नसेल. घटनेत सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, अचानक घडलेल्या या घटनेमुळे सगळ्यांचीच घाबरगुंडी उडाली. घटनेचा व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं, की लहानपणी अनेकदा ते अशी घटना घडू शकते असा विचार करायचे. मात्र, असं काही त्यांच्यासोबत कधी घडलं नाही.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की काही लोक रूममध्ये आराम करत आहेत. काहीच क्षणात आपल्यासोबत मोठी दुर्घटना घडणार असल्याची त्यांना कल्पनाही नाही. यातले दोन व्यक्ती जमिनीवर झोपलेले दिसतात तर एक व्यक्ती टेबलजवळ बसलेला आहे. हे सर्व आपसात बोलत होते. मात्र, इतक्यात छताला असलेला पंखा तुटून धाडकन खाली कोसळला. सुदैवाने ज्याठिकाणी हा पंखा कोसळला, तिथे कोणीही बसलेलं नव्हतं. यामुळे कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. या घटनेनंतर सगळेच हैराण झाले. मात्र, एवढ्या मोठ्या दुर्घटनेतून सुखरूपपणे बाहेर आल्याने त्यांनी स्वतःला भाग्यशाली म्हटलं आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरुन शेअर केला गेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ घंटा नावाच्या अकाऊंटवर पाहू शकता. आतापर्यंत 1 लाख 93 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे, तर अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत. आतापर्यंत 10 लाखहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, हा व्हिडिओ पाहताच रूममध्ये सुरू असलेल्या पंख्याकडे लक्ष गेलं. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, आता मी माझ्या रूममधून पंखा काढून टाकणार आणि कुलर बसवणार.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.