ही चिमुकली ज्यापद्धतीने डान्स करत आहे, तो तिच्या वयातील मुलांना कदाचितच शक्य आहे. कदाचित ही चिमुकली आधीपासूनच क्लासिकल डान्सच शिक्षण घेत असावी, कारण तिच्या हातपायांच्या हालचाली पाहून असं वाटत नाही, की ती पहिल्यांदाच हा डान्स करत असेल. मात्र, हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. आयएएस अधिकारी डॉ. एम. व्ही. राव यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. याला कॅप्शन देत त्यांनी लिहिलं, हाव कूल. हा व्हिडिओ आतापर्यंत 20 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर 2 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. गर्लफ्रेंड सुंदर असल्याने सोडायला लावली नोकरी; तिला आनंदी ठेवायला करतो हे काम अनेक लोकांनी या व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, सो स्वीट. तर दुसऱ्याने लिहिलं, हे देवाने दिलेलं वरदान आहे. यासोबतच आणखी एकाने कमेंट करत लिहिलं, निरागसपणातच खरा आनंद आहे. याशिवाय इतरही अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करत या चिमुकलीच्या टॅलेंटचं कौतुक केलं आहे.How Cool
️ shared pic.twitter.com/uC4iYvl52l — Dr. M V Rao, IAS (@mvraoforindia) January 1, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.