हैदराबाद 05 मार्च : तेलंगणातून आणखी एक वेदनादायक घटना समोर आली आहे. हैदराबादमधील एका 18 वर्षीय विद्यार्थ्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि शुक्रवारी कॉलेजच्या आवारातच तो कोसळला. तेलंगणात 10 दिवसांच्या कालावधीत अचानक हृदयविकाराचा झटका येण्याची ही पाचवी घटना आहे. ही घटना हैदराबादमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑफिससाठी चाललेल्या व्यक्तीला काही सेकंदात मृत्यूने गाठलं, हृदय हेलावून टाकणारी घटना CCTV मध्ये कैद TOI च्या वृत्तानुसार, हैदराबाद जवळील CMR अभियांत्रिकी महाविद्यालयातील बीटेक प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये मित्रासोबत फिरत असताना सचिन हा विद्यार्थी अचानक जमिनीवर पडला. आता व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये विद्यार्थ्यी कोसळण्याआधी त्याची पावलं वाकडी पडताना दिसत आहेत. पडल्यानंतर त्याचे मित्र त्याला उचलण्यासाठी धावले. हा विद्यार्थी मूळचा राजस्थानचा होता. सचिनला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र त्याला वाचवता आलं नाही.
Another #HeartAttack,
— Surya Reddy (@jsuryareddy) March 1, 2023
A 38 yr old Shyam collapsed while playing badminton, in #Hyderabad.
In visuals people take turns to check if he is breathing, If life-saving #CPR had been administered early, he would have probably been alive.
Need awareness on CPR for all.#cardiacarrest pic.twitter.com/EyQD27xoPe
याआधी मंगळवारी रात्री उशिरा हैदराबादच्या लालपेट भागातील प्रोफेसर जयशंकर इनडोअर स्टेडियममध्ये बॅडमिंटन खेळताना ३८ वर्षीय श्याम यादवचा मृत्यू झाला. त्याला शासकीय गांधी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर 27 फेब्रुवारी रोजी निर्मल जिल्ह्यातील पारडी गावात एका 19 वर्षीय तरुणाचा त्याच्या नातेवाईकाच्या लग्नात नाचताना मृत्यू झाला. Shocking Video : स्वयंपाक करताना मोबाईल वापरणं महिलेला भोवलं, घडलं भयानक अवघ्या चार दिवसांपूर्वी हैदराबादमधील जिममध्ये व्यायाम करताना २४ वर्षीय पोलीस हवालदार जमिनीवर कोसळला होता. फेब्रुवारी महिन्यातील अशी पहिलीच घटना शहरातील कालापठार परिसरात 20 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली होती, यात वराला हळद लावत असताना एका मध्यमवयीन व्यक्तीचा अचानक पडून मृत्यू झाला.