नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : आत्तापर्यंत अशा अनेक घटना समोर आल्या आहेत जिथे लोकांनी कित्येक दिवस काहीही विचित्र खाऊन दिवस काढले आहेत. आपण विचारही करु शकत नाही अशा अशा गोष्टी खाऊन लोक काही दिवस काढतात. समुद्र प्रवासात तर अशा अनेक घटना घडत असतात. यामध्ये आणखी एका घटनेची भर पडली आहे. एक व्यक्ती 24 दिवस समुद्रात अडकला होता आणि त्याने काय खाऊन दिवस काढले असतील हा विचारही तुम्ही करु शकत नाही. डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, डिसेंबर 2022 मध्ये, 47 वर्षीय एल्विस फ्रँकोइस सेंट मार्टेन बेटाच्या किनार्याजवळ आपली बोट दुरुस्त करत असताना अचानक त्यांची बोट कॅरिबियन समुद्रात वाहून गेली. ते समुद्रात पूर्णपणे विलग झाले आणि सुटण्याचा कोणताही मार्ग नव्हता. त्याच्याकडे केचअपची बाटली होती. लसूण मसाला आणि मॅगी. समुद्राच्या मधोमध अडकल्यावर आधी त्याला समुद्री शैवाल खाण्याचा विचार आला आणि समुद्राचे खारे पाणी प्यावेसे वाटले, पण ते खूप खारट होते. हेही वाचा - सोबत जगले अन् सोबतच सोडलं जग, पतीच्या निधनानंतर अर्ध्या तासातच पत्नीनेही सोडले प्राण त्याच्या फोनमध्ये नेटवर्क येत नसल्याने त्याच्या साथीदारांशी संपर्कही होऊ शकला नाही. भूक टाळण्यासाठी तो केचअप खाऊन वाचला आणि 24 व्या दिवशी त्याला हेलिकॉप्टरने पाहिले, त्यानंतर कोलंबियाच्या नौदलाने त्याचा जीव वाचवला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. एल्विसने सांगितले की अपघातात त्याने सर्व काही गमावले होते.
दरम्यान, ही घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. एखादा व्यक्ती 24 दिवस केचअप खाऊन कसा राहू शकतो, याबद्दल त्याचं कौतुकही होत आहे. अनेकांना केअपचं नाव घेतलं तरी मळमळायला होतं मात्र काहीही पर्याय नसल्यामुळे त्या व्यक्तीने जगण्यासाठी केचअपची साथ घेतली आणि 24 दिवस त्याच्यावर दिवस काढले.