मराठी बातम्या /बातम्या /Viral /अमानुषपणाचा कळस! मुका जीव तडफडत होता, जीव जाईपर्यंत चौघांनी श्वानाला...; संतापजनक कृत्याचा VIDEO

अमानुषपणाचा कळस! मुका जीव तडफडत होता, जीव जाईपर्यंत चौघांनी श्वानाला...; संतापजनक कृत्याचा VIDEO

श्वानासोबत भयानक कृत्य

श्वानासोबत भयानक कृत्य

माणसांनी भटक्या श्वानासोबत जे केलं ते संतापजनक आहे. हा व्हिडीओ पाहूनच तुमचाही संताप होईल.

  • Local18
  • Last Updated :
  • Haryana, India

हिमांशु नारंग/ 16 मार्च, चंदीगढ : प्राण्यांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांचा संताप झाला आहे. एका मुक्या जीवासोबत माणसांनी जे केलं ते धक्कादायक आहे. माणसांनी अमानुषपणाचा कळस केला आहे. एक मुका जीव तडफडत होता, तरी माणसाला पाझर फुटला नाही. जीव जाईपर्यंत एका श्वानासोबत काही लोकांनी संतापजनक कृत्य केलं. हरयाणातील ही धक्कादायक घटना आहे.

करनालच्या वसंत विहार परिसरात एक भटका श्वान आला. सुरुवातीला काही लोकांनी त्याला हाकलवण्याचा प्रयत्न केला. पण तो तिथून गेला नाही त्यामुळे काही जणांनी आपल्या हातात काठ्या घेतल्या आणि त्या श्वानाची पाठ धरली. श्वानाला काठीने मारत आधी त्याला पळव पळव पळवलं. त्यानंतर एका गेटमध्ये अडकवून तिथंच काठीने मारलं.

धक्कादायक! रस्त्यावरील भटक्या Puppy ला नवऱ्याने घरी आणलं, बायकोचा मृत्यू; असं काय घडलं?

तो गेटमध्ये अडकला होता...काठीने त्याच्यावर वार होत होते... सुटकेसाठी प्रयत्न करत होता.... जीव वाचवण्यासाठी धडपडत होता... तडफडत होता... ओरडत होता... पण कुणालाच त्याची दया आली नाही. मुक्या जीवाची इतकी भयानक अवस्था पाहूनही कुणालाच पाझर फुटला नाही. आजूबाजूचंही कुणी त्याच्या मदतीसाठी धावलं नाही.

अखेर भटक्या श्वानांची मदत करणाऱ्या एका संस्थेला याची माहिती झाली तेव्हा त्या संस्थेतील काही लोक घटनास्थळी आले. त्यांनी तात्काळ त्या श्वानाला हॉस्पिटलमध्ये नेलं. पण त्याला वाचवता आलं नाही. त्याचा मृत्यू झाला.

श्वानांच्या लग्नाचा शाही थाट! लग्नात नाचायला बार डान्सर्स, 3 दिवस सुट्टी, 50 हजार लोकांना 3 वेळा जेवण

या एनजीओशी संबंधित असलेल्या दलजीत कौर यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत त्यांनी सांगितलं की, गल्ली नंबर ४ वसंत विहारमध्ये आरोपी प्रेम सिंहने चौघांसह मिळून कुत्र्याला काठीने मारहाण केली. तरी श्वान तिथून पळून गेला नाही म्हणून त्यांनी त्याला पकडलं आणि कॉलनीतील एका लोखंडी गेटमध्ये त्याची मान अडकवली. त्याच्या तोंडावर काठीने वार केला. श्वान अर्धमेलं झालं होतं. काही वेळातच त्याने प्राण सोडले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. श्वानाचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला. त्यानंतर त्याला दफन करण्यात आलं.

" isDesktop="true" id="850360" >

भटकी कुत्री रस्त्यावर फिरताना दिसली की अनेक लोक त्यांना मारतात. पण ते मुके जी आहेत. त्यांसोबत अशी क्रूरता गुन्हा आहे. तुम्हाला श्वानांपासून त्रास होत असेल तर नगरपालिकेत तक्रार करू शकता, असं दलजीत कौर म्हणाल्या.

First published:
top videos

    Tags: Dog, Local18, Other animal, Viral, Viral video., Viral videos