नवी दिल्ली 13 जून : वाघ, सिंह, बिबट्या, चित्ता हे अतिशय भीतीदायक आणि घातक जंगली प्राणी आहेत. हे प्राणी समोर येताच भल्याभल्यांना घाम फुटतो. मात्र, अनेकांना या प्राण्यांना समोरून पाहण्याची फार इच्छा असते. याच कारणामुळे लोक प्राणीसंग्रहालयांना भेटी द्यायला जातात. बऱ्याचदा इथे असं काही दृश्य दिसतं, ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. सध्या वनविभागाच्या अधिकाऱ्याने ट्विटरवर असंच एक दुर्मिळ फुटेज शेअर केलं आहे. ज्यामध्ये चक्क वाघांचा एक कळप जंगलातून फिरताना दिसत आहे (Streak of Tigers Walking Through Jungle). ताडोबात वाघांचा कळपच पर्यटकांच्या जिप्सीसमोरून जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. शिकारीच्या शोधात पर्यटकांच्या कॅम्पमध्ये शिरला सिंह; शेवटी काय घडलं पाहा, Shocking Video IFS सुसांता नंदा यांनी हा व्हिडिओ (Viral Video) शेअर केला आणि कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, “इथे लक्षात घेण्यासारखी बाब ही आहे की, वाघिणीला सहसा दोन ते चारच पिल्लं असतात. पाच बछडे असणं असामान्य असतं आणि जरी असलीच तरी या सर्वांचं जगणं अतिशय दुर्मिळ आहे. शिकारी प्राण्यांची उच्च घनता हे दर्शवते की इथे मानवी प्रभाव कमी आहे.”
If you haven’t seen a tiger herd, here it is😘
— Susanta Nanda (@susantananda3) June 12, 2022
Remarkable here to note is, a tigress usually have a litter of 2 to 4 only. Five is unusual and survival of all the cubs is rare. Indicating a high density of prey animals in the habitat & little human influence on it. pic.twitter.com/x4tQFiA0z1
व्हिडिओमध्ये, सहा वाघ जंगलातील मातीचा रस्ता ओलांडताना दिसत आहेत. तर जिप्सीमधील पर्यटक प्राण्यांचा हा व्हिडिओ शूट करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सुसांता नंदा यांनी आपल्या अधिकृट ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 24 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी लाईकही केला आहे. पाळीव श्वानांना वाचवण्यासाठी जंगली अस्वलासोबत भिडली महिला; थरारक घटनेचा VIDEO व्हिडिओ नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका ट्विटर यूजरने लिहिलं की, “ही डोळ्यांना आनंद देणारी मेजवानी आहे!” तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिलं की, “हे दृश्य अप्रतिम आहे”. याशिवायही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.