नवी दिल्ली,07 जून : जग हे अनेक रहस्यांनी भरलेलं आहे. कधी कशाविषयी काय रहस्य समोर येईल काही सांगता येत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमांद्वारे आता या रहस्यमयी गोष्टी झपाट्याने व्हायरल होत असतात. अनेक रहस्यमयी फोटो, व्हिडीओ समोर येतात. अशातच थक्क करणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटो आणि त्यामागची गोष्ट जाणून तुम्हीही हैराण झाल्याशिवाय राहणार नाही. माणसांपासून ठिकाणं, वनस्पती, प्राणी सर्वांविषयीच अनेक रहस्य, दडलेल्या गोष्टी समोर येत असतात. असंच काहीसं सध्या समोर आलेल्या फोटोमध्ये पहायला मिळतंय. एक माश्याची प्रजाती समोर आलीये ज्याला चक्क माणसांसारखे दात आहेत. हे ऐकूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, बरोबर ना? याविषयी अधिक जाणून घेऊया.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, 38 वर्षीय स्पिअरफिशर टॉम एल्डर नावाचा व्यक्ती अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये मासेमारी करत होता. यादरम्यान त्याला असा प्राणी दिसला, ज्याचे दात अगदी माणसासारखे होते. त्याचे डोके मोठे होते. जेव्हा तो हा प्राणी पाहण्यासाठी गेला तेव्हा तो एक मासा असल्याचं त्याला दिसून आलं, जो खूप विचित्र दिसत होता.
टॉम एल्डरने सांगितले की, तो खाली पोहत गेला आणि शेवटी त्याने मासा पकडला. टॉमने पुढे सांगितले की माशाचे दात हुबेहुब माणसासारखे होते, जे त्याच्या तोंडाच्या आत वरच्या बाजूला होते. ते मासे त्याच्या मजबूत दातांनी कोंबडे, शिंपले आणि खेकडे खातात. या माशाचे वजन घेतले असता ते 8.6 किलो निघाले. माशाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे दात खूप मजबूत असतात. त्याचे शरीर डायनासोरसारखे असते.आंतरराष्ट्रीय अंडरवॉटर स्पीयर फिशिंग असोसिएशनच्या मते, हा मासा आतापर्यंतचा सर्वात वजनदार मासा आहे. त्यामुळे हा एक जागतिक विक्रम बनला आहे. ते सहसा 1-2 किलो असतात. टॉम म्हणतो की माशाचे वय 15 वर्षे आहे. दरम्यान, यापूर्वीही समुद्रातील अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. अनेक समुद्रातील गोष्टी रहस्यमयी, गूढ, आहेत. ज्या हळूहळू जगासमोर येत आहेत.