जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'नवऱ्याने माझ्या बहिणीला पळवलं त्यांना...'; जिल्हाधिकाऱ्यांकडे महिलेने केली कळकळीची विनंती

'नवऱ्याने माझ्या बहिणीला पळवलं त्यांना...'; जिल्हाधिकाऱ्यांकडे महिलेने केली कळकळीची विनंती

'नवऱ्याने माझ्या बहिणीला पळवलं त्यांना...'; जिल्हाधिकाऱ्यांकडे महिलेने केली कळकळीची विनंती

नवरा-बहिणीबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर महिलेने जिल्हाधिकाऱ्यांकडे घेतली धाव.

  • -MIN READ
  • Last Updated :

**भोपाळ, 08 फेब्रुवारी : ‘**साली आधी घरवाली’ असं मजेमजेत म्हटलं जातं. पण खरोखरच मेहुणी-दाजीचे संबंध असल्याची काही प्रकरणंही समोर आली आहे. सध्या असंच एक प्रकरण चर्चेत आलं आहे. ज्यात एका महिलेचा नवरा आणि बहीण दोघंही घरातून गायब झाले आहेत. पण यानंतर महिलने आपल्या पतीने आपल्या बहिणीला पळवलं असा आरोप केला आहे (Wife complaint about husband). मध्य प्रदेशच्या खालवामध्ये राहणारी मीना जायसवाल जिचा नवरा संदीप जायसवाल आणि तिची बहीण साधना दोघंही एकाच दिवशी घरातून गायब झाले आहेत. तिने याबाबत आधी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि आता जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. दोघांनीही शोधा अशी कळकळीची विनंती तिने केली आहे (Wife accuses husband kidnapping her sister). मीनाने सांगितलं, 9 जानेवारीला सकाळी ती उठली तेव्हा माझा नवरा घरी नव्हता. मी त्याला फोन केला तर त्याने फोनही उचलला नाही आणि नंतर फोन बंदच केला. त्यानंतर मला माझ्या माहेरून समजलं की माझी लहान बहीण साधनाही घरी नाही. पतीनेच छोट्या बहिणीला फसवून अपहरण करून नेलं आहे. हे वाचा -  तुमचा नवरा, बॉयफ्रेंड तुमचाच राहणार; हे औषध घेतल्यानंतर तो चीटिंग करणारच नाही पती संदीप जायसवालने 8 जानेवारी 2022 च्या रात्री छोट्या बहिणीचं अपहरण केलं, असं या महिलेचं म्हणणं आहे.  तिने याबाबत 11 जानेवारीला छीपाबड पोलीस ठाण्यात तक्रारही केली. पण पोलिसांनी अद्यापही कारवाई न केल्याचं तिने सांगितलं. त्यानंतर ती तिच्या भावासह जिल्हाधिकाऱ्यांकडे गेली. जिल्हाधिकाऱ्यांकडे तिने न्याय मागितला आहे. दोघांनाही लवकरात लवकर शोधा, अशी मागणी केली आहे. मीडिया रिपोर्ट नुसार जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात