जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral Video : Live Video या डॉग लव्हरची कमालच टायटॅनिकचा सीनवर भन्नाट डान्स, हसून व्हाल लोटपोट

Viral Video : Live Video या डॉग लव्हरची कमालच टायटॅनिकचा सीनवर भन्नाट डान्स, हसून व्हाल लोटपोट

Viral Video : Live Video या डॉग लव्हरची कमालच टायटॅनिकचा सीनवर भन्नाट डान्स, हसून व्हाल लोटपोट

जर तुम्ही डॉग लव्हर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी मजेशीर आणि मनोरंजन करून जाणारी असेल. सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

  • -MIN READ New Delhi,Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 09 ऑक्टोंबर : जर तुम्ही डॉग लव्हर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी मजेशीर आणि मनोरंजन करून जाणारी असेल. सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, एक माणूस त्याच्या पाळीव कुत्र्यासह टायटॅनिक चित्रपटातील एक प्रसिद्ध दृश्याची नक्कल करत आहे. हे दृश्य पाहून इंटरनेटवर कमेंट्सचा महापूर आला आहे. काही लोक त्याचा क्यूट व्हिडिओचा मनमुराद आनंद घेत आहेत तर काही लोक त्याच्या व्हिडीओची नक्कल करून मनोरंजन करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.

जाहिरात

हा व्हिडिओ madmax_fluffyroad ने इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे. युजरच्या प्रोफाईलवरून कळते की तो प्रचंड डॉग लव्हर आहे. त्याने आपल्या लाडक्या पाळीव कुत्र्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.

हे ही वाचा :  झोमॅटो डिलिव्हरी बॉयसाठी ग्राहक औक्षणाचं ताट घेऊन उभा, तो दिसताच…

या व्हिडिओसाठी, त्याने चांगलाच मेकअप केल्याचे दिसून येत आहे. केसांचा विग आणि ड्रेस घालून तो महिलेच्या वेशात व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. यानंतर कुत्र्याला पाठीवर बांधून टायटॅनिक चित्रपटाचा सीनची नक्कल करण्याचा प्रयत्न करत असतो.

जाहिरात

दरम्यान या व्हिडिओमध्ये चित्रपटाचे थीम साँगही बॅकग्राऊंडमध्ये वाजत आहे. हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी अपलोड करण्यात आला होता. तेव्हापासून ते पाच लाखांहून अधिक वेळा पाहण्यात आले आहे. व्हिडिओला 58,000 हून अधिक लाईक्स आणि सुमारे 800 कमेंट्स आहेत. अनेकजण त्या व्यक्तीची खिल्लीही उडवताना कमेंटमधून दिसून येत आहे.

जाहिरात

दरम्यान इन्स्टा युजर्स म्हणतात कि, तुम्ही केलेला हा व्हिडिओ आम्हाला खूपच आवडला तुमच्यामुळे आमचे मनोरंजन झाले. तर दुसरा म्हणतो कि, हा व्हिडिओ अप्रतिम आहे! वर्षातील सर्वोत्तम पोशाख! हे चित्रपटापेक्षा जास्त भावनिक आहे. तर काहीजण म्हणतात कॉर्सेट आणि दाढी! अर्थात, मॅक्स खूपच सुंदर दिसत आहे! रेकॉर्डर माझ्यापेक्षा खूपच चांगला होता.

हे ही वाचा : OMG! हवेत उडत पोहोचवलं पार्सल; Flying Delivery Boy चा VIDEO तुम्ही पाहिलात का?  

जाहिरात

चौथ्या इंस्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले, हा मी पाहिलेला सर्वात गोंडस कुत्रा आणि मालक आहे. अशाप्रकारे कमेंट्सचा पाऊस त्या व्हिडिओवर पडला आहे. अल्पावधितच हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने याची जोरदार चर्चा होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात