मराठी बातम्या /बातम्या /Viral /OMG! हवेत उडत पोहोचवलं पार्सल; Flying Delivery Boy चा VIDEO तुम्ही पाहिलात का?

OMG! हवेत उडत पोहोचवलं पार्सल; Flying Delivery Boy चा VIDEO तुम्ही पाहिलात का?

सायकल किंवा बाईकवर बसून नाही तर चक्क हवेत उडत डिलीव्हरी बॉय पार्सलची डिलीव्हरी करताना दिसला.

सायकल किंवा बाईकवर बसून नाही तर चक्क हवेत उडत डिलीव्हरी बॉय पार्सलची डिलीव्हरी करताना दिसला.

सायकल किंवा बाईकवर बसून नाही तर चक्क हवेत उडत डिलीव्हरी बॉय पार्सलची डिलीव्हरी करताना दिसला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

दुबई, 06 ऑक्टोबर : ऑनलाईन काहीही ऑर्डर करता येतं आणि जे हवं ते घरपोच मिळतं. यासाठी डिलीव्हरी बॉय किंवा डिलीव्हरी एजंट सायकल, बाईकवर येताना दिसतात पण आता तर चक्क डिलीव्हरी बॉय हवेतून उडत येत डिलीव्हरी करताना दिसला. या फ्लाइंग डिलीव्हरी बॉयला पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

आता जे हवं ते घरबसल्या एका क्लिकवर मिळतं. डिलीव्हरी बॉय जे हवं ते आपल्या घरी डिलीव्हर करून जातो. काही डिलीव्हरी कंपन्यांनी तर रोबोट आणि ड्रोन सर्व्हिसही सुरू केली आहे. आता तर याच्याही पुढे पाऊल टाकण्यात आलं आहे. एक डिलीव्हरी बॉय चक्क हवेत उडत पार्सल पोहोचवताना दिसतो आहे.

हे वाचा - 'या' मुलाच्या आवाजाने जिंकलं लोकांच मन, पण गाणं गाताना केली अशी गोष्ट, Video ठरतोय चर्चेचा विषय

@DailyLoud  ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती हवेत उडताना दिसते आहे. हवेत उडत उडत ही व्यक्ती एका बिल्डिंगवरून दुसऱ्या बिल्डिंगवर जाते. सामान घेऊन एका उंच इमारतीच्या बाल्कनीत उतरते.

तुम्ही नीट पाहिलं तर  या व्यक्तीच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. जेटपॅकच्या मार्फत ही व्यक्ती हवेत उडते आहे. डिलीव्हरी बॉयला असं हवेत उडताना पाहून सर्वजण थक्क झाले.

हे वाचा - सायकल दुरुस्त करणाऱ्या बापाची लेकीनं उंचावली मान, आदिवासी मुलगी रितीका जाणार 'नासा'त

ट्विटर पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ सौदी अरबमधील आहे. जिथं एअर फूड डिलीव्हरी सर्व्हिस सुरू केल्याचा दावा केला जातो आहे.

First published:
top videos

    Tags: Viral, Viral videos