मराठी बातम्या /बातम्या /Viral /Success Story! चार महिला, ज्यांनी घराचा उंबरठा ओलांडत उजळलं स्वत:सह इतरांचं आयुष्य

Success Story! चार महिला, ज्यांनी घराचा उंबरठा ओलांडत उजळलं स्वत:सह इतरांचं आयुष्य

Success Story!  महिलांनी ठरवलं तर आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर त्या स्वत:चं आणि इतरांचं आयुष्य बदलू शकतात. अशाच चार महिलांची ही कथा.

Success Story! महिलांनी ठरवलं तर आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर त्या स्वत:चं आणि इतरांचं आयुष्य बदलू शकतात. अशाच चार महिलांची ही कथा.

Success Story! महिलांनी ठरवलं तर आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर त्या स्वत:चं आणि इतरांचं आयुष्य बदलू शकतात. अशाच चार महिलांची ही कथा.

नवी दिल्ली, 25  फेब्रुवारी : दिल्ली-एनसीआरमध्ये राहणारी स्निग्धा त्रिपाठी असेल, की राजस्थानची उज्ज्वला किंवा जम्मूची पूजा आणि गुजरातची स्नेहा, या सगळ्यांमध्ये एक सामान गोष्ट दिसते. ती म्हणजे, पूर्वी या सगळ्याजणी गृहिणी होत्या. नंतर त्यांनी आपलं आयुष्य क्रांतिकारी पद्धतीनं बदललं.

विशेष म्हणजे, या सगळ्याजणी केवळ स्वतःचं आयुष्य बदलून थांबल्या नाहीत तर त्यांनी इतर अनेक व्यक्तींना हात देत आधार दिला. अनेकांसाठी प्रेरणा (Inspiring Story) बनल्या. या चार राज्यांमधील महिला एकट्यानं आपला लढा लढत अनेकांना बळ देत आहेत.

एनसीआरमध्ये राहणाऱ्या स्निग्धा त्रिपाठी एलएलबी (Snigdha Tripathi LLB) केxल्यानंतर गृहिणी होत्या. 2011 मध्ये त्यांनी नोएडा इथं एका बिल्डरच्या प्रकल्पात (Noida Builder project) काही पैसे देत फ्लॅट बुक केला. बिल्डरनं 2014 साली फ्लॅट ताब्यात देण्याचं वाचन दिलं होतं. मात्र नंतर स्निग्धा यांना कळालं, की ज्या जागी फ्लॅट बांधले जातील ती जागा रेसिडेन्शियल नसून कमर्शियल आहे. त्यांनी बिल्डरला पैसे परत मागितले तेव्हा जातो टाळाटाळ करू लागला. यादरम्यानच स्निग्धाला आपली एलएलबीची डिग्री आठवली.

ती स्वतः दिल्लीच्या न्यायालयात गेली. स्वतःच ही केस लढवत तिनं बिल्डरकडून तीन वर्षानंतर पैसे परत मिळवले. इतर 28 लोकांनीही या बिल्डरकडे फ्लॅट बुक केले होते. तेही स्निग्धा यांच्याशी जोडले गेले. सगळ्यांचे पैसे बिल्डरला परत द्यावे लागले. आता स्निग्धा नियमितपणे वकिलीची प्रॅक्टिस करत आहेत.

दुसरी कथा आहे गुजरातच्या गांधीनगर इथल्या स्नेहाची (Sneha from Gujrat). स्नेहाला अचानक काही पैशांची गरज पडली. एका ऍपच्या माध्यमातून लोन (app loan) घेण्याचा त्यांनी विचार केला. एक कंपनी 3 हजारहून जास्त रकमेचं लोन देत नाही एम्ह्णून त्यांनी चार वेगवेगळ्या कंपन्यांकडून लोन घेतलं. हे लोन त्यांना वेळेवर चुकवता आलं नाही. यानंतर रक्कम वाढत गेली. त्यांना या कंपन्यांकडून धमक्यांचे फोन येऊ लागले. त्यांच्या नातेवाईकांनाही असे फोन जाऊ लागले.

मात्र न घाबरता त्यांनी याविरुद्ध लढायचं ठरवलं. एका सायबरतज्ञाच्या मदतीनं त्यांनी तक्रार नोंदवली. यानंतर आता स्नेहा ऍप लोनच्या विरुद्ध अवेअरनेस कॅम्पेन चालवतात. या प्रकाराला बळी पडलेल्या लोकांना कायदेशीर गोष्टींची मदत करतात. आजवर त्यांनी अशा 20 लोकांची मदत केली आहे.

तिसरी गोष्ट आहे राजस्थानच्या उज्ज्वलाची (Ujjwala from Rajsthan). उज्ज्वला 22 वर्षांपूर्वी सायकल चालवत असे. लग्नानंतर ती संसारात अडकली. 2 वर्षांपूर्वी तिनं आपल्या मुलीची सायकल चालवण्यास सुरवात केली. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना ताने मारले. मात्र तिनं लक्ष दिलं नाही.

नियमित सराव करून त्या कुशल सायकलिस्ट (cyclist) बनल्या. आता त्या गरजू महिलांना सायकल शिकवण्यासाठी लहान-लहान व्हिडिओ युट्युबवर (cycling videos) टाकतात. आजवर 50 महिलांना उज्ज्वलानं सायकल चालवायला शिकवली आहे.

हेही वाचा 8 वर्षांनी सापडला बेपत्ता नवरा, पण घराऐवजी तिनं थेट दाखवला कोर्टाचा रस्ता

जम्मूच्या कठुआ इथं राहणारी पूजा (Pooja from Kathua) चौथी प्रेरणादायी महिला आहे. पूजानं लोकांच्या टीकेकडे लक्ष न देता बस आणि ट्रक चालवायला शिकला.

ती तिच्या प्रदेशातली पहिली महिला बस ड्रायव्हर (first woman bus driver in Jammu) बनली आहे. आता तिला स्वतःचं स्ट्रेनिंग स्कूल उघडायचं आहे. यातून ती महिलांना आत्मनिर्भर बनण्यास शिकवणार आहे.

First published:
top videos

    Tags: Delhi, Employment, Inspiring story, Jammu and kashmir, Rajasthan, Successful Stories, Women empowerment