भोपाळ, 23 फेब्रुवारी : एक, दोन नव्हे तब्बल 8 वर्षे ती त्याची वाट पाहत होती. तिला न सांगताच तो घराबाहेर पडला आणि त्यानंतर परतलाच नाही. तिनं त्याला खूप शोधलं पण तो काही सापडला नाही. अखेर 8 वर्षांनी त्याचा पत्ता लागला. ती त्याच्यापर्यंत पोहोचली, त्याला पाहिलंदेखील. कोणत्याही पत्नीला इतक्या वर्षांनी आपल्या पतीला भेटल्याचा आनंद जितका व्हावा तितकाच आनंद तिलाही झाला. पण आनंदापेक्षा तिला मोठा धक्काच बसला आणि तिनं नवऱ्याला आपल्या घरी नेलं नाही तर थेट कोर्टात खेचलं.
आग्र्यात राहणारी एक व्यक्ती आपल्या बायकोला काहीही न सांगता घराबाहेर गेली. ती परतलीच नाही. त्याच्या कुटुंबानं खूप शोधलं पण तो काही सापडलाच नाही. ती व्यक्ती बेपत्ता होऊन तब्बल 8 वर्षे झाली. आता त्याची मुलंही मोठी झाली आणि त्यांनी आपल्या वडिलांचा शोध सुरू केला.
याचदरम्यान त्यांचे वडील भोपाळमध्ये असल्याचं एका नातेवाईककडून समजलं. तेव्हा मुलं तात्काळ भोपाळला गेली. त्यांना वडिलांचा जो पत्ता मिळाला होता, तिथं गेल्यावर ते दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाल्याचं समजलं. मुलं आपल्या आईला घेऊन या नव्या पत्त्यावर गेले तिथं जाऊन त्यांना धक्काच बसला. कारण त्या व्यक्तीनं दुसरं लग्न केलं होतं आणि दुसऱ्या पत्नीपासून दोन मुलं झाली होती. नवऱ्याचं सत्य समोर येताच महिलेनं त्याला कोर्टात खेचलं. भोपाळच्या फॅमिली कोर्टात हे प्रकरण पोहोचलं.
हे वाचा - बायकोच्या कटकटीपासून वाचण्याची ट्रिक; हर्ष गोयंका यांनी शेअर केला VIDEO
आज तकशी बोलताना रिलेशनशिप काऊन्सलर शैल अवस्थी यांनी सांगितलं, आग्र्यातील या व्यक्तीचं 2008 साली लग्न झालं. तिच्यापासून त्याला चार मुलंही झाली. पण त्यानंतर तो अचानक गायब झाला. भोपाळमध्ये आल्यानंतर तो एका ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करू लागला. यादरम्यान त्याची मित्राच्या बहिणीसोबत मैत्री झाली. मैत्रीच रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनीही भोपाळमध्ये लग्नच केलं. तिथंच त्यांंनी आपला संसार सुरू केला. तिच्यापासून त्याला दोन मुलंही झाली.
आपल्या पतीनं आपला विश्वासघात केला हे दुःख पचवण्याची तयारी महिलेनं दर्शवली पण तिनं एक अटही घातली. तिनं आपण याबाबत पोलिसात तक्रार करणार नाही, असं सांगितलं. पण मुलांच्या भविष्यासाठी तिनं पैशांची मागणी करत कोर्टात याचिका केली. त्याने दर महिन्याला 40000 रुपये द्यावेत, अशी मागणी तिनं केली.
हे वाचा - होत्याचं नव्हतं! घर बांधण्यासाठी साठवलेल्या 5 लाख रुपये वाळवीने कुरतडले
दुसऱ्या पत्नीसोबत आपला संसार सुरळीत सुरू आहे आणि व्यवसायातही चांगला फायदा आहे, ज्यामुळे तो आर्थिकरित्या सक्षम आहे. त्यामुळे पहिल्या पत्नीला दर महिन्याला 40000 रुपये देण्याची तयारी तिच्या नवऱ्यानंही दर्शवली
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Wife and husband