व्हिडीओत पाहू शकता झाडाच्या खोडावर एका बाजूला खार आणि एका बाजूला सिंह आहे. खार वर जाते तसा सिंहसुद्धा वरवर जातो. मग खार हळूच खाली सरकते. दोघंही एकमेकांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यानंतर सिंह खार ज्या दिशेने आहे, त्या दिशेने जातो. खारसुद्धा आपली जागा लगेच बदलते. झाडाच्या खोडाभोवती दोघंही गोलगोल फिरतात. हे वाचा - खतरनाक! उंच कड्यावरून झेपावत हवेत साधला डाव; कधीच पाहिला नसेल शिकारीचा असा VIDEO खार सिंहाची चांगलीच दमछाक करते. हा व्हिडीओ पाहून आपल्याला टॉम अँड जेरी कार्टूनची आठवण येते. त्यात छोटासा उंदीर जशी मांजराची अवस्था करतो तशीच अवस्था या खारीने सिंहाची केली. पण शेवटी ती खार आणि तो सिंह. एवढ्याशा खारीने आपल्या चपळाईने आणि हुशारीने सिंहाशीही टक्कर दिली. आपला जीव वाचवण्यासाठी लढली. पण शेवटी ती सिंहाच्या तावडीत सापडलीच. हे वाचा - अरे बापरे! गाड्यांसमोर येत 2 सिंहांनी घातली झडप; हायवेवरील शिकारीचा थरारक VIDEO पण खारीच्या हिमतीला दाद द्यायला हवी. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तिने सिंहाला चांगलीच टक्कर दिली. सिंहाला ती घाबरली नाही. @RebeccaH2030 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.Arboreal hunt.#Tiredearth pic.twitter.com/UhNjfBAS0W
— Rebecca Herbert (@RebeccaH2030) September 2, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos, Wild animal