मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अरे बापरे! गाड्यांसमोर येत 2 सिंहांनी घातली झडप; हायवेवरील शिकारीचा थरारक VIDEO

अरे बापरे! गाड्यांसमोर येत 2 सिंहांनी घातली झडप; हायवेवरील शिकारीचा थरारक VIDEO

जंगल सोडून सिंह रस्त्यावर आले आणि...

जंगल सोडून सिंह रस्त्यावर आले आणि...

जंगल सोडून सिंह रस्त्यावर आले आणि...

  • Published by:  Priya Lad

अहमदाबाद, 03 सप्टेंबर : सिंहांनी (Lion) केलेल्या शिकारीचे (Lion attacking video) असे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Lion video) होत असतात. पण सिंहांनी केलेली ही शिकार जंगलात असते. पण सध्या सोशल मीडियावर (Social media) जंगलातून बाहेर पडत रस्त्यावर आलेल्या सिंहांनी (Lion on road video) केलेल्या शिकारीचा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे.

गाड्यांची वर्दळ असलेल्या रस्त्याच सिंह शिकार करताना दिसले. दोन सिंहांनी गायीवर हल्ला केला आहे (Lion attack on cow). शिकारीचा हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहूनच धडकी भरते.

प्राणीसंग्रहालय, जंगल सफरी, नॅशनल पार्कमध्ये गेल्यावर दूरूनच सिंहांना पाहून आपल्याला घाम फुटतो. असा सिंह अचानक रस्त्यावरच आपल्या समोर आला तर आपला अर्धा जीव तसा गेल्याच जमा.

हे वाचा - VIDEO - म्हशीवर हल्ला केल्याने चवताळला रेडा; चक्क सिंहांनाही शिंगावर धरून आपटलं

असा एक नव्हे तर चक्क दोन-दोन सिंह रस्त्यावर दिसले. ज्या रस्त्यावर गाड्यांची वर्दळ होती. गाड्या येत-जात होत्या, गाड्यांचा आवाज होता अशा रस्त्यावर सिंह आले. त्यांच्या तावडीत सापडली ती गाय. या गायीवर दोन्ही सिंहांनी हल्ला केला.

व्हिडीओत पाहू शकता कसे दोन्ही सिंहांनी गायीला धरलं आहे. तिला खेचत खेचत रस्त्याच्या मधून रस्त्याच्या कडेला नेले. दोघंही तिच्यावर तुटून पडले आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने गाड्या जाताना दिसत आहे. सिंहांना गायीची शिकार करताना पाहून गाड्या तिथं थांबल्याही. काही जणांनी आपल्या कॅमेऱ्यात हा व्हिडीओ कैद केला.

हे वाचा - चिकन खाऊन प्राणीसंग्रहालयात जाणं पडलं महागात; सापानं गालाची केली वाईट अवस्था

@zubinashara ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट कऱण्यात आला आहे. ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ गुजरातच्या जुनागड शहरातील आहे.

First published:

Tags: Other animal, Pet animal, Viral, Viral videos, Wild animal