वॉशिंग्टन, 04 ऑक्टोबर : ओव्हर ब्रीजखाली अडकलेल्या एका विमानाचा व्हिडीओ (Plane video) व्हायरल होत असतानाच आणखी एका विमानाचा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. या विमानाने पेट घेतला आहे. पक्ष्याने टक्कर दिली (Bird strike on plane) आणि विमानाला आगच (Fire on plane) लागली. त्यानंतर विमानातील प्रवाशांनी विमानातून धडाधड उड्या मारल्या. अमेरिकेच्या न्यू जर्सीतील अटलांटिक सिटीतील ही धक्कादायक आहे. अटलांटिक सिटी एअरपोर्टवर अचानक विमान आगीच्या विळख्यात सापडलं. विमान रनवेवर असताना एका मोठ्या पक्ष्याने विमानाच्या एका इंजिनाला टक्कर मारली. पक्ष्याची धडक बसताच विमानाचं इंजिन पेटलं.
Passengers evacuate Spirit Airlines flight NK3044 on the runway at Atlantic City Airport after the engine caught fire following a bird strike. No injuries reported. https://t.co/0Fe4JyEGfT pic.twitter.com/oMQr79j6Cg
— Breaking Aviation News & Videos (@aviationbrk) October 3, 2021
@aviationbrk ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमुसार, स्पिरीट एअरलाइन्सचं NK3044 हे विमान आहे, ज्यामध्ये ही दुर्घटना घडली आहे. हे वाचा - ओव्हर ब्रिजखाली अडकलं Air India चं विमान; सोशल मीडियावर व्हायरल होतोय VIDEO विमान टेक ऑफ करणार तोच विमानाच्या इंजिनमध्ये आग लागली. सुदैवाने पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. पायलटने विमान तात्काळ थांबवलं आणि आपात्कालीन सेवेशी संपर्क केला. त्यानंतर इतर कर्मतारीही कामाला लागले. फ्लाइट अटेंडेंटने प्रवाशांना तात्काळ विमानातून बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या. या विमानात शंभरपेक्षा जास्त प्रवासी होते. हे वाचा - फ्लाईटमध्येच एअर होस्टेसचा जबरदस्त डान्स; VIDEO चा इंटरनेटवर धुमाकूळ गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबईतही असाच एक विमान अपघात झााला होता. मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला एक पक्षी येऊन आदळला. इंडिगोचे फ्लाइट 6E 5047 मुंबईहून दिल्लीकडे येत होते. यावेळी अचानक विमानाच्या पुढच्या भागावर एक पक्षी आदळला. त्यामुळे विमान पुन्हा मुंबईत बोलवण्यात आलं आणि तातडीने मुंबई विमानतळावर विमान परत लँड करण्यात आलं. मुख्य म्हणजे सुदैवाने या अपघातात एकही प्रवासी जखमी झाला नाही.विमानात बसलेले सर्व प्रवासी सुरक्षित होते. हे वाचा - भरधाव बाईकसोबत फरफटत गेला तरुण आणि…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL प्रवाशांसाठी दुसर्या विमानाची व्यवस्था करण्यात आली. पहिलं विमान रद्द केल्यामुळे मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी विलंब झाला. मात्र प्रवाशांनी इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी आणि क्रु मेंबर्सने दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक केलं.