मराठी बातम्या /बातम्या /Viral /

OMG! छोट्याशा खारीने भयंकर सापाला अक्षरशः कुरतडलं; कधीच पाहिला नसेल असा VIDEO

OMG! छोट्याशा खारीने भयंकर सापाला अक्षरशः कुरतडलं; कधीच पाहिला नसेल असा VIDEO

साप आणि खारीच्या (Squirrel Snake Video) लढाईचा शेवट शॉकिंग आहे.

साप आणि खारीच्या (Squirrel Snake Video) लढाईचा शेवट शॉकिंग आहे.

साप आणि खारीच्या (Squirrel Snake Video) लढाईचा शेवट शॉकिंग आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 06 ऑक्टोबर : साप आणि मुंगूसाची लढाई आपल्यासाठी नवी नाही. दोघंही एकमेकांचे पक्के शत्रू. त्यांच्या फायटिंगचे बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. पण साप आणि खारीची (Squirrel Snake Video) लढाई कधी पाहिली आहे का? भयंकर साप आणि साधीभोळी खार (Squirrel Snake Fight Video) यांच्यामध्ये तुफान फायटिंग झाली. या फायटिंगचा शेवटीही तितकाच धक्कादायक आहे.

साप आणि खारीच्या फायटिंगच हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral video) होतो आहे. व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसला आहे. लढाईचा शेवट असा झाला की ज्याची कल्पनाही कुणी केली नाही.

व्हिडीओत पाहू शकता खार आणि साप आमनेसामने आहेत. साप आणि खार या दोघांच्या ताकदीची कल्पना आहे. त्यामुळे व्हिडीओच्या सुरुवातीला वाटतं की खार सापाची शिकार होईल. पण झालं उटलचं. खारीने तर बाजीच पलटवली.

हे वाचा - Cobra चा सर्पमित्रावर अचानक हल्ला; पाहा थरारक VIDEO

साप नंतर एका खडक्याच्या खाली जातो. खार त्याच्यामागोमाग जाते. खाली असलेल्या सापावर ती आपल्या पंजाने वार करते. आपले पंजे सापावर मारते. सापसुद्धा तिला प्रतिकार करताना दिसतो. जसा साप खारीला दंश करायला जातो तशी खार त्याच्यावर आपला पंजा मारते.  थोड्या वेळाने खार सापाचं तोंड आपल्या हातात धरते. त्याचं तोंड ती उघडते आणि त्याच्या तोंडात ती आपलं तोंड टाकते. सापाचं तोंड खार आपल्या दातांनी अक्षरशः कुरतडते.

हे वाचा - बंदिस्त होण्याआधी कोब्राने घेतला बदला, सर्पमित्रालाच दिला मृत्यू; थरारक VIDEO

लाइफ आणि नेचरचा हा व्हिडीओ आहे. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटरवर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

First published:

Tags: Snake, Snake video, Viral, Viral videos, Wild animal