मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Cobra चा सर्पमित्रावर अचानक हल्ला; पाहा थरारक VIDEO

Cobra चा सर्पमित्रावर अचानक हल्ला; पाहा थरारक VIDEO

व्यक्ती नदीमधील झाडावर चढून साप पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे ही व्यक्ती सर्पमित्र ( Reptile Expert) असून साप पकडण्याचं प्रशिक्षण देखील घेतलं आहे. पण तरीदेखील या सापाने त्यावर हल्ला केला आहे.

  • Published by:  Karishma

बंगळुरू, 13 जानेवारी : सापाचं नाव ऐकलं, तरी अनेकांचा थरकाप उडतो. कोब्रा (Cobra) हा सर्व सापांमध्ये सर्वाधिक विषारी समाजला जातो. यामुळे हा साप पकडताना विशेष काळजी घेण्याची आणि प्रशिक्षण असण्याची गरज आहे. कर्नाटकमधील (Karnataka) शिवमोगामध्ये (Shivamogga) कोब्रा (Cobra) जातीच्या सापाला पकडतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

कर्नाटकमधील या व्हिडीओत सर्पमित्र (Reptile Expert) या सापाला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्याचवेळी कोब्राने त्याच्यावर हल्ला केल्याचं दिसतंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यामध्ये हा व्यक्ती नदीत उतरून या सापाला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.

एएनआय (ANI) वृत्तसंस्थेने हा व्हिडीओ शेअर केला आहे. सर्पमित्र नदीमधील झाडावर चढून साप पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे ही व्यक्ती सर्पमित्र ( Reptile Expert) असून साप पकडण्याचं प्रशिक्षण देखील घेतलं आहे. पण तरीदेखील या सापाने त्यांच्यावर हल्ला केला आहे. या व्हिडीओत या व्यक्तीच्या हातात साप पकडण्याची काठी आहे. याच्या मदतीने तो साप पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.

(वाचा - एक पाय नाही मात्र जिद्द दुप्पट; 'बॉडी बिल्डिंग' क्षेत्रात महिलेची जबरदस्त चर्चा)

हा कोब्रा जातीचा साप नदीमध्ये (River) लपला असताना या सापाचं शेपूट बाहेर आल्यानंतर त्याला पकडण्याचा प्रयत्न केला जातो. पण हा साप खूप मोठा आणि शक्तिशाली असल्याने व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो.

दरम्यान, सापाने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर व्यक्ती खाली पडतो. यामुळे साप या व्यक्तीला डसण्याचा प्रयत्न करतो. पण नशीब बलवत्तर, साप त्याच्यापर्यंत न पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. यानंतर दोघांनी मिळून या सापाला पकडलं.

First published:

Tags: Viral videos