मराठी बातम्या /बातम्या /Viral /

तुमची नजर, बुद्धिमत्तेची घ्या चाचणी! चित्रातल्या 'या' वृद्धाच्या पत्नीला शोधा 11 सेकंदांत

तुमची नजर, बुद्धिमत्तेची घ्या चाचणी! चित्रातल्या 'या' वृद्धाच्या पत्नीला शोधा 11 सेकंदांत

चित्रातील वृद्धाच्या पत्नीला शोधा 11 सेकंदात

चित्रातील वृद्धाच्या पत्नीला शोधा 11 सेकंदात

विशिष्ट प्रकारची रंगसंगती, प्रकाशयोजना, आकार यांच्यामुळे आपला मेंदू नसलेल्या गोष्टीची प्रतिमा तयार करतो. याचा फायदा मेंदूची गोष्टी समजून घेण्याची क्षमता ओळखण्यात होतो. म्हणूनच त्यासाठी ऑप्टिकल इल्युजन अर्थात दृष्टिभ्रमाचा वापर केला जातो.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

ऑप्टिकल इल्युजन अर्थात दृष्टिभ्रमाचा उपयोग मानसशास्त्रामध्ये केला जातो. दृष्टिभ्रम म्हणजे एखाच्या वस्तूची, गोष्टीची डोळ्यांना फसवणारी प्रतिमा. दृष्टिभ्रम भौतिक, शारीरिक आणि आकलनात्मक असे तीन प्रकारचे असतात. माणसाचा मेंदू गोष्टींचं आकलन कसं करतो, हे जाणून घेण्यासाठीही मानसशास्त्रात दृष्टिभ्रमाचा वापर केला जातो. एखाद्या चित्राकडे किंवा परिस्थितीकडे सामान्य माणूस खूप वैविध्यपूर्ण दृष्टिकोनांमधून पाहू शकतो. मेंदू अधिक तल्लख करण्याच्या दृष्टीनं दृष्टिभ्रम खूप उपयुक्त ठरतात. त्याचंच एक उदाहरण आपण आता पाहू या. सोबत दिलेल्या चित्रात एक वृद्ध शेतकरी त्याच्या पत्नीला शोधत आहे. त्याच्या पत्नीचा चेहरा त्याच चित्रात लपलेला आहे. तो चेहरा 11 सेकंदांमध्ये शोधणारी व्यक्ती खूपच तल्लख बुद्धीची असेल. या संदर्भातलं वृत्त 'जागरणजोश डॉट कॉम'ने दिलं आहे.

या चित्रामध्ये एक मजेशीर कोडं आहे. लहानांसाठी आणि प्रौढांसाठी ते तयार केलेलं आहे. या चित्रात एक वृद्ध माणूस त्याच्या पत्नीला शोधतो आहे असं दाखवलं आहे. त्याच्या पत्नीचा चेहरा शोधण्याचं काम वाचकांना करायचं आहे. हा चेहरा चित्रातच कुठे तरी दडलेला आहे. चित्र पाहताना त्यातला माणसाचा चेहरा व तो शोधत असल्याची कृती दिसते. हा वृद्ध माणूस शेतात उभा आहे. त्याच्या मागे घर आहे, हे सर्व जण पाहतात; मात्र त्याच्या पत्नीचा चेहरा शोधू शकत नाहीत. आतापर्यंत हजारो जणांनी या चित्रातल्या वृद्धाच्या पत्नीचा चेहरा शोधण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

हेही वाचा - बापरे! रस्त्यावर आलेल्या वाघासोबत सेल्फी घ्यायला गेले तरुण आणि...; काय झाला शेवट पाहा VIDEO

हे चित्र काळजीपूर्वक पाहिल्यास चित्रात वृद्धाच्या पत्नीचा चेहरा नक्की दिसू शकेल. चित्र उलट करून पाहिल्यास चेहरा शोधणं आणखी सोपं होईल. वृद्ध व्यक्तीच्या शेजारी असलेल्या झुडपामध्ये त्याच्या पत्नीचा चेहरा दडलेला आहे.

या चित्रातल्या वृद्धाच्या पत्नीचा दडलेला चेहरा 11 सेकंदांच्या आत शोधणारी व्यक्ती असाधारण बुद्धिमत्ता असलेली असेल, असा दावा करण्यात आला आहे. अभ्यास असं सांगतो, की बुद्धीला चालना देणारी जास्तीत जास्त कोडी सोडवली, तर मेंदू तल्लख होत जातो.

विशिष्ट प्रकारची रंगसंगती, प्रकाशयोजना, आकार यांच्यामुळे आपला मेंदू नसलेल्या गोष्टीची प्रतिमा तयार करतो. याचा फायदा मेंदूची गोष्टी समजून घेण्याची क्षमता ओळखण्यात होतो. म्हणूनच त्यासाठी ऑप्टिकल इल्युजन अर्थात दृष्टिभ्रमाचा वापर केला जातो. दृष्टिभ्रमाद्वारे बुद्धिमत्तेची चाचणी घेणारं हे चित्र म्हणजे मजेशीर कोडं आहे.

First published:

Tags: Test